धुळे : कोरोनाच्या संकटकाळात देशात राबविल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला धुळे महापालिकेने (Dhule Corporation) छेद दिला. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या विविध गंभीर आरोपानंतर, तसेच ‘सकाळ’च्या विशेष मालिकेच्या पाठपुराव्यामुळे बनावट लसीकरण प्रमाणपत्र गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपासात काही पुरावे समोर आल्याने शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यासह चौघांना शनिवारी अटक केली. (Vaccination certificate Fraud Case Updates)
मालेगावचा संबंध
असलेल्या या बनावट लसीकरण प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता तपास करावा आणि दोषींच्या मुसक्या आवळण्याच्या सक्त सूचना शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, ब्रदर उमेश पाटील आणि कंत्राटी कर्मचारी अमोल पाथरे याला आज अटक केली. या चौघा संशयितांना जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
महापालिकेत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण न करता बनावट प्रमाणपत्र वितरित केल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात उजेडात आले होते. डोस न देता लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र वितरित झाल्याकडे स्थायी समिती सभेत प्रथम भाजपचे सदस्य सुनील बैसाणे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवी करत दुर्लक्षाचा प्रयत्न केला पण बैसाणे यांच्या दबावामुळे आयुक्तांनी उपायुक्त गणेश गिरी यांच्याकडे चौकशी सोपविली.
‘सकाळ’ने विशेष मालिकेव्दारे पाठपुरावा केल्यानंतर चौकशी अहवालाअंती प्रशासनाला गुन्हा दाखल करणे भाग पडले.
पोलिस अधिकाऱ्यांची तत्परता
पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी गांभीर्याने हे प्रकरण हाताळत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना बारकाईने सखोल तपासाची सूचना दिली. कर्तव्य आणि प्रामाणिकतेतून शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने कसून चौकशी सुरू केली. यात बनावट प्रमाणपत्राचे मालेगाव कनेक्शनही सापडले होते. मालेगावच्या आरोग्याधिकाऱ्यांनी एकाच बॅच क्रमांकाने दोन डोस दिले गेल्याचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचे पत्र येथील मनपा प्रशासनाला दिले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.