waghnakhe sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : वाघनखे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक;मुख्यमंत्री,छत्रपतींच्या पराक्रमाचा अपमान सहन करणार नाही

‘‘अफजल खानाचा वध ही स्वराज्य स्थापनेतील मोठी घटना होती. यवनांच्या राजसत्तेला हा सुरुंग होता. ही घटना भारताच्या इतिहासातील सोन्याचे पान आहे. त्यात वापरलेली वाघनखे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व वीरतेचे प्रतीक आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : ‘‘अफजल खानाचा वध ही स्वराज्य स्थापनेतील मोठी घटना होती. यवनांच्या राजसत्तेला हा सुरुंग होता. ही घटना भारताच्या इतिहासातील सोन्याचे पान आहे. त्यात वापरलेली वाघनखे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व वीरतेचे प्रतीक आहेत. या वाघनखांवर आक्षेप म्हणजे छत्रपतींच्या पराक्रमाचा अपमान केल्यासारखे आहे. शिवभक्त हे कदापि सहन करणार नाहीत. छत्रपतींचे मावळे व शिवभक्तच विरोधकांना याचे उत्तर नक्की देतील,’’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

लंडनहून साताऱ्यात आणण्यात आलेल्या वाघनखांच्या शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहात प्रारंभ झाला. त्याचा सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘राज्याच्या दृष्टीने हा भाग्याचा व आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला आली. तमाम मराठी मने आज सुखावली आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला आहे.’’

माझ्या नखांचा वार दिसत नाही

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना वाघनखांची प्रतिकृती भेट दिली. तो धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघनखांचा वापर करा, असे सूचक वक्तव्य केले. त्यावर शिंदे म्हणाले, ‘‘ही वाघनखे योग्य वेळी आली आहेत. माझ्या वाराचे ओरखडे बसलेले दिसत नाहीत आणि वार बसला की तोंड उघडून सांगता ही येत नाही. त्यामुळे या वाघनखांचा वापर नक्कीच योग्य ठिकाणी होईल.’’

गडावर मद्यप्राशन केल्यास शिक्षा

राज्यात आणखी काही वर्षे वाघनखे राज्यात राहावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. छत्रपतींच्या अन्य वस्तूही महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन देत छत्रपतींच्या गडावर मद्य प्राशन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास झाला. त्यांना संपवून छत्रपतींनी स्वराज्य उभे केले. त्याचप्रमाणे वाघनखांबाबत विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांच्या मेंदूला, बुद्धीला आलेली बुरशी व गंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढावा.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

वाघनखांबाबत बरेच दिवस राज्यात चर्चा सुरू आहेत. चांगले घडत असताना खोडा घालणाऱ्यांना काय समाधान मिळते हे समजत नाही. नव्या पिढीला हा इतिहास समजला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाघनखे पाहिलीच पाहिजेत. जीवन सार्थकी होईल. छत्रपतींचा इतिहास समजेल.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांपर्यंत पोचवण्यासाठी एक समिती नेमून अधिकृत चरित्र प्रकाशित करावे. वाघनखे खरी असल्याची इतिहासात नोंद आहे.

- उदयनराजे भोसले, खासदार

चार टपाल तिकिटांचे प्रकाशन

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील शस्त्रास्त्रांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन पटामधील महत्त्वाच्या वस्तूंवरील चार विशेष टपाल तिकिटांचे अनावरणही यावेळी झाले.

प्रतापगड प्राधिकरणाचे उदयनराजे अध्यक्ष

गडकिल्ल्यांच्या संवर्धनाअंतर्गत प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्रतापगड विकासासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराणी ताराराणी समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT