students esakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांमध्ये मूल्यशिक्षण पुस्तकाच? संस्कृती, नात्यांचाही विसर; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, तुमची मुले निश्चितपणे राखतील वडिलधाऱ्यांचा मान

व्यक्तीच्या अंगी शिक्षणातून मूल्ये रुजवून त्याचा उपयोग स्वत:साठी, राष्ट्रसेवेसाठी होणे म्हणजेच मूल्यशिक्षण. संस्कार करण्याची कुटुंब, शाळा व समाज ही प्रमुख केंद्रे आहेत. माध्यमिक स्तरावरील वय हे संस्कारक्षम असल्याने या वयात मूल्य शिक्षणाचा पाया भक्कम होतो.

तात्या लांडगे

सोलापूर : व्यक्तीच्या अंगी शिक्षणातून मूल्ये रुजवून त्याचा उपयोग स्वत:साठी आणि राष्ट्रसेवेसाठी होणे म्हणजेच मूल्यशिक्षण. मानवी मनावर संस्कार करण्याची कुटुंब, शाळा व समाज ही प्रमुख केंद्रे आहेत. माध्यमिक स्तरावरील वय हे संस्कारक्षम असल्याने या वयात मूल्य शिक्षणाचा पाया भक्कम होतो.

सदाचरण, सत्य, अहिंसा, प्रेम, शांती, या शाश्वत जीवनमूल्यांची शिक्षण पद्धतीत नव्या उद्दिष्टानुसार प्रतिस्थापना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण व मूल्यशिक्षण हे विषय आहेत, पण त्यावर फोकस केला जात नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. समाजात निर्भीडपणे वावरता यावे, महिला-मुलींची भीती दूर व्हावी, यासाठी मूल्यशिक्षण काळाची गरज बनली आहे.

मूल्यशिक्षणाची नेमकी गरज कशासाठी?

  • १) आधुनिक तंत्रज्ञानाने भारावलेल्या पिढ्या भारताच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेव्यांच्या मुल्यापासून आपण दूर जात आहोत. सांस्कृतिक व मानवतेचा ऱ्हास, विलगीकरणाची भावना नष्ट होत आहे. सामाजिक व राष्ट्रीय विभक्तपणाची शक्ती लोकशाहीबद्ध समाजाची कठीण परीक्षा पाहत आहेत. लोकसंख्या विस्फोटामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाचा दर्जा घसरत असून सामाजिक ताण व अशांतता वाढली आहे. गुन्हेगारी, हिंसाचार वाढत आहे.

  • २) विज्ञानाची प्रगती, विभक्त कुटुंबपद्धती, विविध व्यसनाधीनतेचे वाढते जाळे, अशा अनेक कारणांमुळे सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनावर योग्य संस्कार शाळेतून गरजेचे आहेत.

  • ३) आपले राष्ट्र म्हणजे सुखासाठी राखून ठेवलेली भोगभूमी नसून मानवतेच्या उपासनेसाठी आपल्याला प्राप्त झालेली यज्ञभूमी आहे. येथे मानवांचे संम्मेलन, संस्कृतीचा समन्वय, सर्व धर्माचे अनुष्ठान असावे.

  • ४) एकीकडे भ्रष्टाचार, अनाचार, स्वाधिनता, काळा बाजार, पाशवी वृत्ती वाढत आहे. दुसरीकडे पैशाची हाव, विध्वसंक वृत्ती, सत्ताधंता वाढत आहे. पर्यावरणाचे बिघडत चालले असंतुलन, प्रदूषण, नैसर्गिक प्रकोप, वाढती लोकसंख्या आणि बेकारीचा प्रश्न वाढत आहे.

  • ५) विद्यार्थी अवस्था ही जीवनातील अपरिपक्व परंतु, महत्त्वाची अवस्था आहे. यावेळी स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याची कुवत नसते. जाणून घेऊन ते पेलण्याची हिंमत नसते, असे समजून- उमजून न घेतलेले स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना तारक न ठरता मारकच ठरेल. त्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणाची गरज आहे.

‘ही’ नऊ मूल्ये रुजविणे जरुरी

  • - बौद्धिक मूल्ये : कुशाग्रता, बुद्धिमत्ता, विषयज्ञान

  • - सामाजिक मूल्ये : बंधुत्व, संघनिष्ठा, सहकार्य

  • - मानसिक मूल्ये : जिज्ञासा, आवड, मानसिक क्षमता

  • - व्यावसायिक मूल्ये : निष्ठा, आवड, जबाबदारी, सचोटी

  • - सांस्कृतिक मूल्ये : संस्कृतीवर्धन, प्रेम व आदर

  • - अनुशासन मूल्ये : शिस्त, आज्ञापालन

  • - नैतिक मूल्ये : सत्य, त्याग, नीतिमत्ता, सेवाभाव

  • - धार्मिक मूल्ये : स्वधर्माचा अभिमान, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता

  • - राष्ट्रीय मूल्ये : राष्ट्रीय एकात्मता, समता, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताबद्दलची जाणीव

बालभक्ती अन् मूल्यशिक्षणाची नितांत गरज

सध्या मूल्यशिक्षणााठी बालभक्ती केंद्रांची गरज आहे. समाजात भीतीदायक वातावरण असल्याने पालकांनाही मुलांची चिंता वाटते. शेजारधर्म राहिलेला नाही. मोबाईलचा अतिवापर होतोय. त्यामुळे आता शालेय जीवनात मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज असून बालवयात मूल्यशिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांना भविष्याचा रास्त मार्ग सापडेल आणि निश्चितपणे समाजातील दुषितपणा कमी होईल, असा विश्वास शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विणा जावळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

Nagpur Accident News: अतिशय गंभीर...52 विद्यार्थी प्रवास करत असलेली ट्रॅव्हल्स पलटी, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT