vanchit aahadi chief prakash ambedkar criticize mns raj Thackeray on manoj jarange patil 
महाराष्ट्र बातम्या

तुमचा बोलवता धनी कोण? मनोज जरांगेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा सवाल

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. जरांगेंचा बोलवता धनी कोण? असा सवाल त्यांनी केला होता. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोणं असं म्हणता, पण तुमचा बोलवता धनी कोण आहे? असं म्हणत आंबेडकर यांनी निशाणा साधला. आंबडेकरांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. जरांगे उपोषणाला बसले असताना आंबेडकांनी त्यांना पाठिंब्याचं पत्र पाठवलं होतं. (vanchit aahadi chief prakash ambedkar criticize mns raj thakeray on manoj jarange patil knp94)

आंबेडकरांनी मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झालेल्या वादावरही भाष्य केलं. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. अशी परिस्थिती असताना लोकांना भिडवण्याचं काम सुरु आहे. घटनेच्या चौकटीमध्ये राहून मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते, तेव्हा त्यांच्या तोंडावर सांगून आलो होती की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. असल्या प्रकारचं आरक्षण मिळत नसतं. निवडणुकीच्या तोंडावरच असे मुद्दे कसे समोर येतात. त्यांच्या पाठिशी कोण आहे हे पाहावं लागेल. त्यांचा बोलवता धनी कोण? हे काही दिवसांत समोर येईल, असं राज ठाकरे म्हणाले होते.( Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

Local Update: गोरेगाव-कांदिवली लाईनवर काम; 23 आणि 24 सप्टेंबरला 6.5 तासांचा ब्लॉक, काही गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT