Vande Bharat Train Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vande Bharat Train : ४०० वंदे भारत ट्रेनचा बांधणीसाठी रशियातील कंपनीशी करार! रावसाहेब दानवे यांची माहिती

लातूर येथील कारखान्यात ४०० वंदे भारत ट्रेनचा बांधणीसाठी रेल्वेने एका रशियन कंपनीसोबत करार केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - नेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात येणार असून येथे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहे. त्याचे प्रत्यक्ष काम जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

तसेच लातूर येथील कारखान्यात ४०० वंदे भारत ट्रेनचा बांधणीसाठी रेल्वेने एका रशियन कंपनीसोबत करार केला असल्याची माहितीही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शनिवारी सीएसएमटीचा कार्यक्रमात दिली आहे.

सीएसएमटी येथील फलाट क्रमांक सहा आणि सातच्या ठिकाणी तर्पण : संवेदना फाउंडेशनच्यावतीने मुंबई रेल्वे स्थानकातील बूट पॉलिश कामगारांना बूट पॉलिश किटचे वितरण करण्यात आले आहे. तर्पण फाऊंडेशनचे प्रमुख आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या संकल्पनेतून हे बूट पॉलिश किट तयार करण्यात आले आहे.

शनिवारी दहा बूट पॉलिश कामगारांना बूट पॉलिश किटचे वाटप करण्यात आले असून येत्या तीन महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ५४० बूट पॉलिश कर्मचाऱ्यांना 'चरण सेवा' म्हणून आसन व्यवस्था असलेले किटचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, दिग्दर्शक व सिनेअभिनेते महेश मांजरेकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नीरज लालवानी, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल उपस्थित होते.

४०० वंदे भारत ट्रेनची बांधणी -

यावेळी दानवे म्हणाले की, सीएसएमटी स्थानकाचा कायापालट लवकरच होणार आहे. त्यासाठी २४०० कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. मात्र पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतीला धक्का लागू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच दानवे यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने वंदे भारत ट्रेन निर्मिती व्हावीत यासाठी रेल्वेच्या लातूर येथील कारखान्यात ४०० वंदे भारत ट्रेनची बांधणी करणार आहे. त्यासाठी आरव्हीएनएलने एका रशियन कंपनीसोबत करार केला असून लवकरच प्रत्यक्ष वंदे भारतची निर्मिती सुरू होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT