Vasant More esakal
महाराष्ट्र बातम्या

Vasant More: अरे किती नाराज तात्या; अजित पवारांच्या ऑफरवर वसंत मोरे म्हणाले...

मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची रंगली चर्चा

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, वसंत मोरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Vasant More on Ajit Pawar offer Maharashtra Politics NCP MNS )

वसंत मोरे काय म्हणाले?

पुणे शहराचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नाला मी बावदाण या ठिकाणी गेलो होतो. तिथं बंटी पाटील हेदेखील होते. त्यांच्यासोबत अरविंद शिंदे होते. रुपालीताई चाकणकर या सुद्धा होत्या. त्याचवेळी अजित पवार यांची एन्ट्री झाली. आणि दादा स्वतःहून माझ्याकडे आले आणि अरे किती नाराज तात्या या आम्ही वाट बघतोय तुमची.

योगयोगाने पुन्हा दोघांची भेट झाली. त्यावेळी अजित पवार वसंतराव या बरं का वाट बघतोय असं म्हणाले. अशी माहिती वसंत मोरे म्हणाले.

कदाचित हा माझ्या कामाचा सन्मान आहे. अजित पवार स्वतःहून मला बोलवत आहेत. मी ज्या मार्गावर आहे तो मार्ग अतिशय योग्य वाटतो अशी भावना वसंतराव मोरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

नाराज का?

पक्ष वाढीची कोणतीही भूमिका नाही. पक्षातील लोक कमी कशी होतील याकडे लक्ष अधिक. मला या लोकांची लाज वाटते. कारण माझ्या वाढदिनाला कमीतकमी लोक कशी येतील इथपासून जर ही लोकं पाहत असतील तर ह्यांना पद कशाकरता दिली असा प्रश्न पडतो.

येरोडोच्या कार्यक्रमात गेल्यानंतर मी स्टेजवर येण्याआधीच दीपप्रज्वलाचा कार्यक्रम पार पडला होता. पण वसंत मोरेंना कधीच अस्तित्वाची भिती वाढली नाही. ज्यांना भिती वाटतो तोच छुप्याने वागतो. माझी नाराजी मी थेट राज ठाकरे यांच्याकडे पोहचवली आहे. माझ्या उपक्रमांवेळी अनेक बैठका घेतल्या जातात. त्यावेळी स्वतः राज ठाकरेंनी दखल घेतली होती. पण न्याय मिळाला नाही. चिंतन शिबिरला निमंत्रण मिळालं नाही. माहितीदेखील नव्हत.

तसेच आगामी निवडणुकीत वसंत मोरे यांच्या शर्टावर मनसेचा लोगो राहिलं की दुसऱ्या कोणत्या पक्षाचं. असा सवाल उपस्थित केला असता. ते म्हणाले, ते वेळ ठरवेल.

कुरघोडीचं राजकारण सुरु आहे. अतिशय घाणेरडं राजकारण आहे. मी काही शोपिस नाही. मी कुठल्या कळपातला नाही. कळपात शेळ्या मेढ्या चालताय. वाघ हा एकटा येत असतो असा इशाराही वसंत मोरे यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT