Vasant More
Vasant More Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vasant More: इथेही 'तेच' कारण! वसंत मोरेंनी फोडलं वंचितवर खापर; म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचा मला फोन आला...

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेतला. मनसे सोडल्यानंतर वंचितसोबत गेलेल्या वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलणार असल्याची माहिती दिली. काल त्यांनी मातोश्रीवरती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ९ जुलै रोजी त्यांचा ठाकरे गटात पक्षपवेश होणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान आज त्यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज केल्यांची होता.

यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज केला होता. 'साहेब मला माफ करा', असं मी त्यांना मेसेजमध्ये लिहले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता. पण आता खूप उशीर झाला आहे मी त्यांना ठीक आहे बोललो, पण काल उद्धव ठाकरे यांना भेटलो, असेही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.

याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या 18-19व्या वर्षी मी इकडेच शिवसेनेची शाखा सुरु केली. 31 वर्षांचा होईपर्यंत मी शिवसेनेतच होतो. त्यामुळे आता मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 9 जुलैला मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Constituency: भोसरी विधानसभा कुणाच्या पारड्यात? अजित गव्हाणेंची शरद पवार गटात एन्ट्री, ठाकरे गटाची चिंता का वाढली?

Virat Kohli: अमित मिश्रानं विराटवर केलेले LSG खेळाडूंबरोबर भांडणाचे आरोप; पण नवीन-उल-हक म्हणाला, 'गोष्टी आता...'

Kangana Ranaut: बंड अन् विभाजन सामान्य गोष्ट, राजकारण करु नये तर गोलगप्पे विकावे का?; एकनाथ शिंदेंसाठी कंगना मैदानात!

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना कधी मिळणार मानधन? योजनेबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

ENG vs WI, Test: दुसऱ्या कसोटीपूर्वी 'या' स्टेडियमच्या एंडला मिळणार स्टुअर्ट ब्रॉडचे नाव, वडीलही झाले भावुक

SCROLL FOR NEXT