Vasantdada Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Vasantdada Patil : एका लग्नासाठी जिल्हापरिषदेच्या बदलीचा नियम तडकाफडकी बदलणारे वसंतदादा पाटील

वसंतदादा अगदी लहान वयात स्वातंत्र्य चळवळीत सामील

सकाळ डिजिटल टीम

Vasantdada Patil : एका टिव्ही चॅनेलवर कोणतातरी कॉमेडी शो सुरू होता. त्यामध्ये एका कलाकाराने विनोद केला, की, मंत्रायलात आलो मंत्र्यांची सही घेतली आणि गावाच्या वेशीवर जाईपर्यंत सरकार बदललेलं होतं. त्यामूळे पून्हा सहीसाठी यावं लागलं. ऐकलं आणि हसू आलं.

हे राजकारण एकीकडे आणि दूसरीकडे याच महाराष्ट्राच्या भूमीत एक भुमीपूत्र या सत्तेच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर चार टर्म बसला होता. ते म्हणजे वसंत बंडूजी पाटील होय. दादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते.

वसंतदादा पाटील हे मूळचे सांगलीचे. सांगलीतील पद्माळे हे त्यांचे गाव. या लहानशा खेड्यात वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी 13 नोव्हेंबर 1917 रोजी दादांचा जन्म झाला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यावेळी केवळ एक वर्षाचे असणाऱ्या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण, त्यामूळे त्यांचे कुठेही अडले नाही.

वसंतदादा अगदी लहान वयात स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून ते स्वातंत्र्य लढ्यात जोमाने सहभाग घेतला. ब्रिटीश सरकारच्या फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे,अशी कामगिरी करून त्यांनी करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करण्याचे कामही कामे त्यांनी केले.

मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यावरही दादांनी नेहमी सामान्य जनतेचा अधिक विचार केला आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायदा कसा बदलता येतो, हे दादांनी महाराष्ट्राला शिकवले.

निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत. दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत कर्मचा-यांची बदली केली जात नव्हती. तसा कोणताही नियम नव्हता.

अशा परिस्थितीत एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीचे लग्न ठरले. वधू-वर दोघेही जिल्हापरीषदेत नोकरीला होते. मुलगा पुण्यात तर मुलगी औरंगाबादमध्ये होती. लग्न ठरले, लग्नाची तयारीही सुरू झाली. लग्नामूळे वधूची बदली पुणे जिल्हापरिषदेत करण्याची मागणी नातेवाईकांकडून व्हायला लागली. पण, अशी बदली करता येत नाही. त्यामूळे लग्न मोडावे की नोकरी सोडावी, अशा मनस्थितीत ती बिचारी वधू अडकली. तसेच, कुटूंबातील लोकही बुचकळ्यात पडले. हा विषय वसंतदादांपर्यंत पोहोचला. त्यांनी याबाबत चौकशी करण्यास सांगितले.

चौकशीअंती असे समजले की, ‘सरकारी नोकरीत असा कोणताही नियम बनवण्यात आला नाही. त्यामूळे एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली होऊ शकत नाही. त्यावर जास्त वेळ न दवडता दादा म्हणाले, ‘हो हे माहितीय, म्हणून तर तुम्हाला बोलावले आहे. आजपासून एका जिल्हापरिषदेतून दुस-या जिल्हापरिषदेत कोणत्याही अडचणींशिवाय बदली करून घेता येईल.

असा प्रस्ताव त्यांनी सचिवांना तयार करून आणण्यास सुचवले. वेळ न दवडता दादांनी त्यावर सही केली. तो प्रस्ताव आला त्यावर सहीही झाली. हा निर्णय त्याच दिवशी रात्रीच्या बातम्यांमध्येही सांगण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने तसा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ते लग्न यशस्वीही झाले.

स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकारात वसंत दादांची भूमिका महत्त्वाची होती. क्रांतिसिंह नाना पाटील, नाथा लाड, बापू लाड, नागनाथ नायकवडी, पांडू मास्तर असे सगळे क्रांतिकारी सातारा जिल्हा घुसळून काढत होते. दादा पकडले गेले. पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले. तटावरून उड-या मारल्या. पोलिसांनी गोळीबार केला. दादांचे साथीदार पांडू मास्तर गोळीबारात बळी पडले. आणि पून्हा त्यांना अटक करण्यात आली.

आयुष्यभर दादांची सेवा यशवंत हाप्पे यांनी केली. यशवंत हे दादांचे सेवक होते. मुख्यमंत्रीपद गेल्यावर यशवंताला दादांनी नवी नोकरी शोधायला लावली होती. पण, यशवंत त्यांना म्हणाले की, ‘दादा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही..’ यशवंत दादांना सोडून कधीच गेला नाही. तो शेवटपर्यंत दादांसाठी जगला.

सुमारे 25 वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व विधानसभा आणि लोकसभेत केले. पण दादा आहेत हे सांगली जिल्ह्याचा विकास सांगून जातो. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. आज 34 वर्षे सरली दादा आपल्यात नाहीत. दादांनंतर काँग्रेस पक्षाला बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT