जालना- लक्ष्मण हाके यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालण्याच्या वडीगोद्री गावामध्ये हाके उपोषण करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये गेले आहेत. ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच असायला हवे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी घेतली आहे.
ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच असायला हवे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहायला हवा. सरकारने हाकेंच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला हवं. परिस्थिती स्फोटक असल्याची माहिती मी शासनाला दिली आहे. पण, सरकार कुठलही पाऊल उचलताना दिसत नाही. मराठ्यांना ओबीसीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर सामाजिक सलोखा बिघडेल. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. अनेक वेळा महाराष्ट्रमध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आला आहे. राजकीय पक्ष आहेत. त्यांचे नेते जे आहे त्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही आमची भूमिका आधीच जाहीर केली आहे. ओबीसीचे असणारे आरक्षणाचे ताट वेगळं असलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले.
समाजामध्ये चढ-उतार होत असतो. नवीन कुठलातरी वर्ग निर्माण होतो, त्याला शासनाच्या मदतीच्या आवश्यकता असते. ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशाप्रकारे मदत करायची हा शासनाचा अधिकार आहे. सरकारची हा प्रश्न सुटावा अशी मानसिकता नाही. दोन समाजांना एकमेकांना भिडवत राहणे, विधानसभेपर्यंत एकमेकांना भिडवत राहतील याची काळजी सरकार घेत आहे अशी माझी धारणा आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
लक्ष्मण हाके हे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ नये यासाठी आमरण उपोषण करत आहेत. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवे यावर ठाम भूमिका घेतली आहे. ओबीसी आंदोलकांनी गुरुवारी धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता-रोक केल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवाय, टायर जाळण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचं चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.