VBA Prakash Ambedkar on alliance with udhhav thackeray shivsena sharad pawar Maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : ...तर वंचित अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होईल; प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचीत बहुजन आघीडी यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आङे.आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना या युतीची घोषणा झाल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान महविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही. आमची युती शिवसेनाशी आहे असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

वंचित आणि शिवसेनेच्या युतीनंतर राजकीय समिकरणे बदलली आहेत. यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आम्ही वंचित असू तर आमची दखलच नका घेऊ. महविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही.

आमची युती शिवसेनाशी आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आगामी निवडणूकांसाठी जागा वाटपावरून आमच्यामध्ये (उद्धव ठाकरे) चर्चा झाली आहे असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांच्या बरोबर जायचेअसेल तर जुळतील. बघायचं डावीकडे आणि हाथ टाकायचं उजवीकडे हे मला चालत नाही आणि पटत नाही.

मी आज ही सांगतो सेना आणि वंचित एकत्र लढली आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

रामदास आठवले यांनी खरी भीमशक्ती नरेंद्र मोदींसोबत असून, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची युती ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची युती म्हणता येईल. मात्र, या युतीला शिवशक्ती-भीमशक्ती म्हणता येणार नसल्याचे म्हटले आहे.

भाजप सत्ता टिकवण्यासाठी इडी, आयकर विभाग, आयबी, स्थानिक पोलीस यांना वापरतील जो त्यांचे ऐकणार नाही त्यासाठी आर्थर रोड जेल मोकळा आहे असा टोला यावेळी आंबेडकरांनी भाजपला लगावला.

पुण्यातील दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीबद्दल बोलताना आम्ही दोघे बसून ठरवू. चिंचवडची निवडणूक खलाटे यांनी लढली होती त्यासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना जो पर्यंत समंजस्य होत नाही. आघाडी मध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे याचे एकमत होत नाहीये, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना त्यांची भूमिका घ्यावी लागेल. आम्ही आणि सेना काय करणार याचा निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT