Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta : वेदांता प्रकल्पासाठी मविआने पैसे घेतले? अजित पवार स्पष्टच बोलले

दत्ता लवांडे

मुंबई : वेदांताचा प्रकल्प गुजरातेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालू आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने वेदांता प्रकल्पासाठी टक्केवारी मागितली होती असा आरोप मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला होता. त्यानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

(Ajit Pawar On Vedanta Project Commission)

"महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आम्ही प्रकल्प महाराष्ट्रात यावेत यासाठी प्रयत्न केले. तर काही जणांकडून आमच्यावर आरोप केले जात आहेत पण आम्ही असं काही केलं नाही, या प्रकरणाची चौकशी करा. उगाच तरूण आणि नागरिकांमध्ये संभ्रम पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे" असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प वेदांताने गुजरातला नेणार असल्याचं सांगितलं होतं अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण हे साफ चुकीचं असून फक्त महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

"मागच्या सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळी हा प्रकल्प होण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण आता आमच्यावर चुकीचे आरोप केले जातात. हे चुकीचे आहे, पण ते आरोप करत असतील तर चौकशी होऊद्या, दूध का दूध पानी का पानी होऊद्या" असं म्हणत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे आश्वासन देऊन दोन महिने झाले तरी अजून पैसे जमा झाले नाही असा आरोप विरोधीपक्षनेत्याने यावेळी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT