Velhe Taluka Renamed as Rajgad esakal
महाराष्ट्र बातम्या

Velhe Taluka Renamed : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला राजगड किल्ल्याचे नाव! मंत्रिमंडळ बैठकीत मिळाली मंजूरी

Velhe Taluka Renamed as Rajgad : आता पुणे जिल्ह्यातील व्हेले तालुका राजगड म्हणून ओळखला जाणार आहे. राज्य सरकाच्या मंत्रिडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

रोहित कणसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. तसेच या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला राजगड किल्ल्याचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामांतराला मंजूरी देण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे तालिक्याचे नाव बदलून राजगड करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते असताना केली होती. या तालुक्याला राजगड किल्लयाचं नाव देण्यात याव अशी मागणी नागरीक देखील अनेक दिवसांपासून करत होते. आजच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली आहे. या बैठकीत अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे...

  • मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर

  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये

  • अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता़

  • केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता

  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार

  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प

  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज

  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ

  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार

  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार

  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार

  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.

  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

  • आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार - ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

  • पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते

  • भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

  • महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT