Vidhanparishad Election News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhanparishad Election News: अजित पवार शब्द खरा करणार? खासदारकीची संधी हुकलेल्या तरूण नेत्याला देणार विधान परिषदेची उमेदवारी

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. महायुतीमध्ये भाजपला ५, शिंदे गट २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला विधानपरिषदेच्या २ जागा आल्या आहेत. या दोन जागांसाठी अजित पवार गटाने उमेदवार निश्चित केल्याची माहिती आता समोर आली आहे. या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नाव फायनल करण्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीसाठी नाव निश्चित करण्यात आले नसून त्यावर चर्चा सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाच्या कायदेशीर बाबी पाहतात. परभणी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटकरांचे नाव जवळपास फायनल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या नावावर बैठकीत अद्याप एकमत झाले नसल्याने चर्चा सुरूच असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या या बैठकीमध्ये विधानपरिषदेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली होती. यानंतर सहा जणांची नावं निश्चित करण्यात आली. यामध्ये बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, संजय सावंत, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर ६ नावांपैकी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांच्या नावावर विधानपरिषदेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांपैकी नऊ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे (MVA) 2 उमेदवार सहजपणे निवडून येण्याची शक्यता आहे. 11 व्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील उत्सुक आहेत. त्यांची यावेळी विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कोणाकडे किती आहे संख्याबळ ?

महायुती

भाजप -103 शिंदे सेना – 37 राष्ट्रवादी (AP) - 39 छोटे पक्ष - 9 अपक्ष - 13 असे एकूण - 201

महाविकास आघाडी

काँग्रेस - 37 ठाकरे गट - 15 राष्ट्रवादी (SP) - 13 शेकाप - 1 अपक्ष - 1 असे एकूण - 67

एमआयएम - 2, सपा - 2, माकप - 1 क्रां. शे. प. - 1 एकूण - 6 आमदार तटस्थ .

एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT