Vidhan Parishad Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Biennial Vidhan Parishad Election: द्विवार्षिक विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान अन् मतमोजणी

या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यानं ही निवडणूक जाहीर झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यानं ही निवडणूक जाहीर झाली आहे. ही द्विवार्षिक निवडणूक आहे, कारण दर दोन वर्षांनी यातील सदस्य बदलत जातात. (Biennial Vidhan Parishad Election announced for 11 seats voting and counting will be on July 12)

कुठले सदस्य होताहेत निवृत्त?

  1. डॉ. मनिषा कायंदे

  2. विजय गिरकर

  3. अब्दुल्ला खान दुरानी

  4. निलय नाईक

  5. अॅड. अनिल परब

  6. रमेश पाटील

  7. रामराव पाटील

  8. डॉ. वजहत मिर्झा

  9. डॉ. प्रज्ञा सातव

  10. महादेव जानकर

  11. जयंत पाटील

निवडणुकीचा असा असेल कार्यक्रम

  • नोटिफिकेशन - मंगळवार, २५ जून २०२४

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख - मंगळवार, २ जुलै २०२४

  • उमेदवारी अर्जांची छाननी - बुधवार, ३ जुलै २०२४

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - शुक्रवार, ५ जुलै २०२४

  • निवडणूक दिनांक - शुक्रवार १२ जुलै २०२४

  • मतदानाची वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

  • मतमोजणी - शुक्रवार, १२ जुलै २०२४. संध्याकाळी ५ वाजता.

  • निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक - मंगळवार, १६ जुलै २०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT