Vidhanparishad Election sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

येत्या २६ जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा आज केली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - येत्या २६ जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा आज केली. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे २०१२ आणि २०१८ मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.

‘शिक्षक भारती’कडून सुभाष मोरे

शिक्षक भारती संघटनेकडून मागील १८ वर्षे विधानपरिषदेवर शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आ. कपिल पाटील यावर्षी निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. शिक्षक भारती संघटनेकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आ. कपिल पाटील यांनी सांगितले, की तीन वेळा संघटनेने संधी दिल्यानंतर कुठेतरी थांबायला हवे. घराणेशाही आणि एकाधिकारशाहीला आपण विरोध करायचा आणि स्वत: पदाला चिकटून बसणे योग्य नाही. सुभाष मोरे संघटनेचे अनेक वर्षे काम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT