Vijay Shivtare esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Shivtare : ''मी माघार घेणारच नव्हतो, पण एक फोन आला...'' शिवतारेंचं बंड शमवण्यामागे मुख्यमंत्र्यांचा खास माणूस

''मला शारीरिक, मानसिक त्रास झाला.. पाच वर्षे विकासकामे रखडली. विमानतळ, पाणी पुरवठा अशी कामं खोळंबली गेली. मला कुणाला दोष द्यायचा नाही. पण आत्ता मी माझ्या प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत आणि त्या मान्य झाल्या आहेत.''

संतोष कानडे

Vijay Shivtare News : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर त्यांचं बंड मागे घेतलं आहे. अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्याने ते मागच्या आठवड्यापासून चर्चेत आले होते. अखेर महाविकास आघाडीतील तिन्ही नेत्यांनी हे बंड शमवलं आहे. शिवतारे यांनी बोलताना बंड मागे घेण्यामागे एक फोन कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट केलं आहे.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, मी माघार घेणारच नव्हतो परंतु मला एक फोन आला आणि त्यांनी माझं मतपरिवर्तन केलं. तो फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विजय शिवतारे म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा फोन आला. त्यांनी मला पटवून दिलं की, माझ्या निर्णयामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नुकसान होऊ शकतं. मुख्यमंत्री अडचणीत येतील आणि दहा-वीस खासदार पडतील, त्यामुळे मी निर्णय मागे घ्यावा असं त्यांनी सांगितलं. यानंतरच आपण निर्णय मागे घेतल्याचं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना कॉन्फरन्स कॉल

मुख्यमंत्र्यांचं ओएसडी खतगावकर यांच्याशी बोलणी झाल्यानंतर शिवतारे यांनी निर्णय मागे घेण्याचा विचार केला. तेव्हा खतगावकर यांनी मुख्यमंत्र्यांचं कॉन्फरन्स कॉलवरुन शिवतारेंशी बोलणं करुन दिलं. ''सुरुवातीला मुख्यमंत्री माझ्यावर रागावले होते. नंतर ओएसडींनी मध्यस्थी केली. ओएसडींनी माझं मुख्यमंत्र्यांशी कॉन्फरन्सवर बोलणं करुन दिलं. मग मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.'' असं शिवतारे म्हणाले.

शिवतारे पुढे म्हणाले की, मला शारीरिक, मानसिक त्रास झाला.. पाच वर्षे विकासकामे रखडली. विमानतळ, पाणी पुरवठा अशी कामं खोळंबली गेली. मला कुणाला दोष द्यायचा नाही. पण आत्ता मी माझ्या प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत आणि त्या मान्य झाल्या आहेत. पुढच्या पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT