Vijay Wadettiwar 
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : विकासाच्या नावाने तिघंही तिजोरी ओरबाडतायत; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यातच आज वडेट्टीवार यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या आमदारांची जबाबदारी अजित दादा यांच्यावर आहे. फडणवीसांच्या आमदारांची जबाबदारी फडणवीसांवर आणि शिंदेंच्या आमदारांची शिंदेंवर असल्याने विकासाच्या नावावर तिजोरी ओरबडत आहेत. हे तिघे डाकू आणि लुटेरे आहेत, ज्यांना तिजोरी साफ करायची आहे. जनतेच्या विकासाचा प्लॅन नाही तर आमदारांच्या विकासाचा प्लॅन असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

अजित पवारांच्या कंत्राटी भरतीच्या स्पष्टीकरणावर वडेट्टीवार म्हणाले की, 35 संवर्गासाठी जीआर होता, ही बनवाबनवी आहे. अजित दादांनी फसवणूक करू नये, नव्याने जीआर काढताना विरोध दर्शविला होता. आता काय पुळका आला की कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेशनमध्ये पद भरण्याचा समावेश आहे. त्यामुळे दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीतील फुटीवर वडेट्टीवार म्हणाले की, पक्षात दोन गट पडले हे स्पष्ट झाले आहे, अस्तित्वाची लढाई असल्याने शरद पवार साहेबांसमोरून अजित पवार जात नाही, मागून जातात. गिल्टीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून दिसून येत असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT