Vinayak Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

शेवाळेंच्या नियुक्तीवर आक्षेप; विनायक राऊत सुप्रिम कोर्टात जाणार

एकनाथ शिंदे समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली

धनश्री ओतारी

एकनाथ शिंदे समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. मात्र, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत आम्ही तीन पत्र पाठवूनही एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला.(Vinayak Raut speaker recognised rahul shewale as shiv sena leader in lok sabha)

विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. १८ जुलैला रात्री साडे आठ वाजता गटनेतेपदी कोणी क्लेम केला तर आम्हाला आमचं म्हणनं मांडण्यासाठी संधी द्या. अशा पद्धतीची संधी पत्र देत केली. त्यानंतर २२ जुलैला त्यासंदर्भात भेटून पत्र दिलं. मात्र, अचानक लोकसभा पोर्टलवर जे पत्र वाचलं तेव्हा यामध्ये अध्यक्षांनी पत्राची दखल घेतली नसल्याचे समजले.

आमची बाजू न ऐकता गटनेत्या पदाला मान्यता देण्यात आली. आमच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांना बंडखोर गटाचा फ्लोअर लिडर बनवायचा होता तर ज्या दिवशी त्यांनी पत्र दिलं त्यादिवशीपासून अमंलबजावणी व्हायला हवी होती. परंतु त्यांनी पत्र दिलं १९ तारखेला आणि १८ तारखेला अमंलबजावणी झाली. त्यामुळे, पक्षपातीपणे निर्णय झाल्याची आम्हाला शंका आहे. त्यासंदर्भात अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना लेखी विचारणा करणार असल्याचे राऊतांनी यावेळी म्हटले आहे.

खरतंर गटनेतेपदी निवड करण्याचा अधिकार त्या त्या पक्षप्रमुखांना असतो. त्यामुळे आम्ही जे त्यांना पत्र दिल होत त्याची दखल घेणं गरजेचं होते. परंतु आमच्या पत्राला कोणतही उत्तर न देता एकतर्फि निर्णय घेण्यात आला. शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केला आहे. असा आरोप करत आणि यासंदर्भात सुप्रिम कोर्टात धाव घेणार असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

तसेच, आजतरी शिवसेना पक्ष गटनेत मीच आहे. त्यामुळे याबाबतची कायदेशीर लढाई आम्ही करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही आवाहन नक्की देणार. असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT