Bullock cart race esakal
महाराष्ट्र बातम्या

Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी काही व्हायरल व्हिडिओंना (Social media news) नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्हिडिओमध्ये शाळेतील मुलाला बैलगाडा शर्यतीचं एवढं वेड (maharastra news) आहे की, ती शर्यत पाहण्यासाठी परिक्षा सोडून थेट घाटावर धाव घेतल्याचे दिसुन आले आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये बैलगाडा शर्यतीचं प्रमाण जास्त आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. लाखो रुपयांची बक्षीसे असणाऱ्या या स्पर्धेचे आकर्षण गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहे.

सुजल उर्फ जगदाळे असं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सतत अनाउसमेंट करताना आपल्याला ऐकाय़ला येतो. सुजलला बैलगाडा शर्यत पाहायची आहे. आणि त्यामुळे त्यानं चक्क परिक्षा सोडून बैलगाडा घाटावर धाव घेतली आहे. शाळेतून पळून आल्यानं त्याच्या शिक्षकांनाही धक्काच बसला आहे. दरम्यान त्या घाटावर प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली आहे. सुजल उर्फ बुलटला शोधण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी संपर्क कक्षाशी बोलून मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्या निवेदकानं सतत सुजल उर्फ बुलट कुठं असेल त्यानं शाळेत जावे. आज त्याचा पेपर आहे. आणि त्याला शोधण्यासाठी शिक्षक आले आहे असे तो म्हणतो. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या कमेंटस देखील केल्या आहेत.

सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करताना दिसतात. हल्ली लाईक्स आणि व्ह्युजच्या हव्यासापोटी वाट्टेल त्या प्रकारचे व्हिडिओ आणि रिल्स करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा उद्धट आणि बेशिस्तपणे वागणाऱ्या काही सोशल मीडिया स्टारला अद्दल घडवली आहे. टिक टॉक स्टार म्हणून आपल्या भागात प्रसिद्ध झालेल्या अशा स्टारला पोलिसांनी जागेवर आणले. नागपूरमध्ये देखील एका बहादरानं गाडीवर वेगवेगळे स्टंट करत जीव धोक्यात घालून केलेले रिल्स चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT