Kolhapur election Esakal
महाराष्ट्र बातम्या

वडगाव बाजार समितीत शाहू आघाडीची बाजी; विरोधी महाविकास आघाडीचा धुव्वा

उमेदवार व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

विवेक दिंडे

पेठवडगाव (कोल्हापूर) : वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अमल महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे (Amal Mahadik, Vinay Kore, Prakash Awade) यांच्या सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकुन निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. या निवडणुकीत विरोधी आमदार राजु आवळे (Raju Aawale) व सहकार्यांच्या महाविकास आघाडीस एकही जागा जिंकता आली नाही. या निकालानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

येथील महालक्ष्मी मंगलधाम येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. प्रगती बागल, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मक्सुद शिंदी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरु झाली. विकास सेवा सोसायटी गटापासुन मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासुनच सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली होती. या गटातुन आकरा उमेदवार उभे होते. त्यामुळे यांचा निकाल पहिल्यांदा आला. यामध्ये सव्वादोनशे मतांची आघाडी घेतली. त्यानंतर बहुमत सिध्द झाल्यानंतर उमेदवार निश्‍चिंत झाले. चुरस होईल आशी आशा होती.परंतु तशी झाली नाही.

या निवडणुकीत पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील(Satej Patil ) व हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजु आवळे,खासदार धैर्यशील माने यांची महाविकास आघाडी व विरोधात माजी आमदार महादेवराव महाडीक,जनसुराज्यचे आमदार विनय कोरे,आमदार प्रकाश आवाडे,राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,माजी खासदार राजु शेट्टी,माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये सत्ताधारी राजर्षी शाहु शेतकरी विकास आघाडीने सर्व जागावर विजय मिळवुन बाजार समितीवर आपला कब्जा केला.

सत्ताधारी राजर्षी शाहु शेतकरी विकास आघाडीने सर्व जागावर विजय मिळवुन बाजार समितीवर आपला कब्जा केला.

राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार असे:

विकास सेवा,संस्था गट-किरण जयसिंगराव इंगवले(९०६), विलास बाबासाहेब खानविलकर(८९४), सुरेश तात्यासो पाटील(८८५), जगोंडा लक्ष्मण पाटील(८८२), शिवाजी पांडुरंग पाटील(८७९), आण्णासो बंडू डिग्रजे(८६५), बाळकृष्ण गणपती बोराडे(८५६), भारती रावसो चौगुले(८९४), वैशाली राजेंद्र नरंदेकर (८६२), चाॅद बाबालाल मुजावर (८८२),धुळगोंडा आण्णासो डावरे(८६७), ग्रामपंचाय गट:राजू मगदूम(४१०), सुनिता मनोहर चव्हाण(४०२), नितीन पांडुरंग कांबळे(४११), वसंतराव शामराव खोत(४२७), अडचे व्यापारी गट:सागर सुनिल मुसळे(६६२), संजय बाबूराव वठारे(६६२), हमाल तोलाई गट:नितीन विष्णू चव्हाण (४३)

गेल्या पंचविस वर्षात वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी केंद्रबिंदु मानून काम केले आहे.या गोष्टीवरच विश्वास ठेवुन शेतकरी-व्यापारी यांनी मतांच्या रुपात राजर्षी शाहू आघाडीस सत्ता दिली आहे. पुढील काळात शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव व बाजार समितीचा चांगल्या पध्दतीने विकास साधून शेतकऱ्यांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.

- माजी आमदार, अमल महाडीक,(सत्ताधारी राजर्षी शाहु शेतकरी विकास आघाडी)

या निवडणुकीत अनेक सामान्य लोकांना संधी दिली. मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.या निवडणुकीकडे पराभवाच्या नजरेतुन न पहाता विकासाच्या नजरेतुन बघत आहे. बाजार समितीच्या, शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी यापुढे कार्यरत रहाणार आहे. यापुढील काळात देखील शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी ठाम राहू. सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे.

आमदार राजूबाबा आवळे,(महाविकास आघाडी)

या निवडणुकीत विद्यमान सहा संचालकांना संधी मिळाली आहे.यामध्ये सुरेश पाटील,विलास खानविलकर,जगोंडा पाटील,बाळकृष्ण बोराडे,नितिन चव्हाण,संजय वठारे अशी सहा जनांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT