Wagh Nakh esakal
महाराष्ट्र बातम्या

Wagh Nakh : महाराष्ट्र शासनाची जाहिरात लंडनमध्ये; परदेशात असलेल्या मराठी अभिनेत्रीने शेअर केले फोटो

संतोष कानडे

Maharashtra Government : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. त्याची एक जाहिरात आता लंडनमध्येदेखील केली जातेय. एका वाहनामधून एलईडी प्रोजेक्टरद्वारे ही जाहिरात दाखवली जात आहे.

महाराष्ट्र सरकारची जाहिरात लंडनमध्ये झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो झळकले आहेत. याशिवाय जाहिरातीच्या वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचेही फोटो आहेत.

मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही सध्या कामानिमित्त लंडनमध्ये आहे, तिने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या जाहिरातीचे फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेला व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, लंडनमधील व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियममधून (Victoria and Albert Museum) आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची नाहीत, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (History Researcher Indrajit Sawant) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. त्यासंदर्भात म्युझियमकडून पत्र मिळाले असून, शासनातील संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

म्युझियमकडून मागविलेल्या माहितीतून ती वाघनखं शिवरायांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही. शासन, मंत्री, संबंधित अधिकारी महत्त्वाची माहिती जनतेपासून लपवत असून, ही गंभीर बाब आहे. शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत आहे.’ असंही सावंत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT