सोलापूर : उजनी धरण sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनी धरणातून १० मार्चला सोलापूरसाठी पाणी! भीमा नदीकाठावरील वीजपुरवठा राहणार बंद; जलसंपदा विभागाचे ‘महावितरण’ला पत्र

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे. सोलापूरकरांसाठी आता १० मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: दहा दिवस हे पाणी सुरू राहणार असून त्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी धरणातून सोडावे लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे. सोलापूरकरांसाठी आता १० मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: दहा दिवस हे पाणी सुरू राहणार असून त्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी धरणातून सोडावे लागणार आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुसरीकडे उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये देखील तशीच चिंताजनक स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी यापूर्वीच सव्वामीटरने खाली गेली असून मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ३८ अंशावर गेले असून नवीन लागवड केलेली पिके या तडाख्यात माना टाकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा न्यायला बंदी घातली असून सर्व साठ्यांमधील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महावितरण विभागाला पत्र पाठविले असून उजनीतून पाणी सोडल्यानंतर १० ते २१ मार्च या काळात टप्प्याटप्प्याने भीमा नदीकाठच्या कृषीपंपांचा विद्युतपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. औज बंधाऱ्यात पाणी पोचले की धरणातून सोडलेले पाणी बंद केले जाणार असून त्यानंतर थेट एप्रिलअखेर किंवा मे महिन्यातच उजनीतून पुन्हा सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल.

नदी काठावरील वीजपुरवठा राहणार बंद

सोलापूर शहरासाठी साधारणत: १० मार्चपासून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. औज व चिंचपूर बंधाऱ्यात सध्या पाणी असल्याने तसे नियोजन केले असून औज बंधाऱ्यात पाणी पोचले की उजनीतून पाणी बंद केले जाईल. तोवर भीमा नदी काठावरील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असून तसे पत्र महावितरणला दिले आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

उजनी धरण उणे १८ टक्क्यांवर

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या उणे १८ टक्क्यांवर पोचले आहे. धरणाची पातळी खालावल्याने कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्याचा पर्याय संपुष्टात आला आहे. त्यामुळे भीमा नदीतूनच सोलापूरसाठी पाणी सोडण्याचा एकमेव पर्याय शिल्लक असून धरण तळ गाठत असल्याने सोलापूर- उजनी या जुन्या जलवाहिनीसाठी देखील दुबार पपिंगची तयारी सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED in Action: ॲमेझॉन-फ्लिपकार्टवर ईडीची कारवाई; मोठ्या शहरांमध्ये 20 ठिकाणी टाकले छापे, काय आहे प्रकरण?

Success Story : नोकरीच्या मागे न लागता पदवीधर तरुणाने फुलवली केळी बाग; वीस गुंठ्यांत घेतले 'इतक्या' लाखांचे उत्पन्न

Bus चालवताना चालकाला Heart Attack, कंडक्टरने फिल्मी स्टाईलमध्ये स्टेअरिंग हाती घेतले, मात्र...

Nagpur Assembly Election 2024 : जातीय समीकरण साधण्यात काँग्रेसला अपयश; तेली मतदारांसह मुस्लीम, हलबांकडे दुर्लक्ष

Shah Rukh Khan: सलमाननंतर आता शाहरुख खानला धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी ट्रेस केला कॉल

SCROLL FOR NEXT