Water Resources Department of Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : जलसंपदाचे 495 कनिष्ठ अभियंत्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत; पुण्यात साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’, असे आपल्याकडे उपरोधिकपणे म्हटले जाते. पण त्याहीपेक्षा गलथान कारभार जलसंपदा विभागाच्या भरतीत झाल्याचे दिसून येते. कनिष्ठ अभियंता भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन चार वर्ष झाले तरी ४९५ अभियंत्यांना नियुक्ती मिळालेली नाही.

त्यामुळे सोमवारी (ता. २८) पुण्यातील सिंचन भवनासमोर प्रतीक्षेतील उमेदवार साखळी उपोषण करणार आहेत. (Water Resources 495 Junior Engineer Awaiting Recruitment nashik news)

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ५०० पदांच्या भरतीसाठी २२ जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. इच्छुकांनी २५ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केले. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी सहा विभागीय केंद्रांवर परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आणि कोरोनाचा संसर्ग वाढला.

त्यामुळे ही परीक्षा थेट ६, ९ व १२ ऑगस्ट २०२३ मध्ये पार पडली. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली. ४९५ व्यक्तींची अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध झाली. उमेदवारांना नियुक्तिपत्र दिलेले नाही. एका विभागाची भरतीप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चार वर्षे वाट बघितल्यानंतरही नियुक्ती आदेश मिळत नसल्याने निवड झालेल्या परीक्षार्थींना नैराश्याने ग्रासले आहे.

त्यांनी अनेकदा आमदार, खासदारांची भेट घेतली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनही मार्ग मोकळा झालेला नाही. त्यामुळे सोमवारी हे उमेदवार आपल्या कुटुंबासमवेत पुण्यातील सिंचन भवनसमोर साखळी उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सिंचन भवन व संबंधित पोलिस ठाण्यास पत्रही दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उमेदवारांची हतबलता

कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सिंचन भवन पुणे येथील मुख्य अभियंता हे अध्यक्ष व अधीक्षक अभियंता हे सचिव आहेत. उमेदवार त्यांच्याकडे पाठपुरावा करतात तेव्हा ‘सर्व काही मंत्रालयात आहे, आमच्या हातात काही नाही’, असे सांगितले जाते. प्रत्येक वेळी हेच उत्तर मिळत असल्याने उमेदवार हतबल झाले आहेत.

घटनाक्रम

- २२ जुलै २०१९ : जाहिरात प्रसिद्ध

- २५ जुलै २०१९ : फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

- ६, ९, १२ ऑगस्ट २०२२ : परीक्षाप्रक्रिया पूर्ण

- २४ मार्च २०२३ : सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध

- १०, ११, १२ एप्रिल : उमेदवारांची कागदपत्र पडताळणी

- २० जून २०२३ : ४९५ उमेदवारांची अंतिम निवडयादी प्रसिद्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT