bhavana gawali e sakal
महाराष्ट्र बातम्या

आम्ही गद्दार नाही, आमच्या बापानं शिवसेना उभी केलीए - भावना गवळी

वाशिम या आपल्या मतदारसंघात खासदार भावना गवळी यांनी आज जाहीर सभा घेत शक्तीप्रदर्शन केलं.

सकाळ डिजिटल टीम

वाशिम : आम्हाला गद्दार बोललं जात पण आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमच्या बापानं ही शिवसेना उभी केली आहे, असं विधान शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी यांनी केलं आहे. त्यांनी आज आपल्या वाशिम या मतदारसंघात जाहीर सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्याचं मतदारसंघात जोरदार स्वागतही करण्यात आलं आणि रॅलीही काढण्यात आली. (We have not left Shiv Sena my father developed it says Bhavna Gawali)

खासदार गवळी म्हणाल्या, "विद्यापीठाचं उपकेंद्र या जिल्ह्यामध्ये व्हावं या मागणीला पुर्णत्वाकडं नेण्यासाठी तुमचं पाठबळ आम्हाला गरजेचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की, लोक म्हणतात आम्ही गद्दार आहोत वैगरे. पण शिवसेना आम्ही उभी केली आमच्या बापानं उभी केली. आमच्या वडिलांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून या ठिकाणी ही शिवसेना दिसते आहे. कोणाचा तरी त्याग होता, म्हणून ही शिवसेना वाढली"

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेत आहोत. उलट आम्ही शिवसेना-भाजप युती अखंड करण्याच काम केलं आहे. शिवसेनेत आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आमच्यासोबत १२ तेरा खासदार बाहेर पडतात. ४० आमदार बाहेर पडतात. याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. मी लढणारीच नव्हे तर लढून जिंकणारी आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा तुमच्या आशीर्वादानं फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी गवळी म्हणाल्या.

फडणवीसांचं केलं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला आपण मुंबईला गेलो तर अडीच अडीत तास उभं राहून ते प्रत्येक व्यक्तीला भेटले. नेता कसा असावा तर जनतेतला असाव, सर्वसामान्य माणसाला साथ देणारा असावा, असाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपानं महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस त्यांची साथ देत आहेत. फडणवीसांनी देखील गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं, एवढे मोठे मोर्चे हाताळले, एवढी मोठी काम केली. त्याचंही एक वेगळचं स्थान आहे राजकारणात समाजकारणात. त्यामुळं आपण महाराष्ट्राच्या विकासाची शपथ घेतील असून आपल्याला सर्वांना त्यांची साथ द्यायची आहे. ही साथ मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. मी जे बोलते ते करतेच. जोपर्यंत ही खुर्ची आहे तोपर्यंत तिचा उपयोग तुमच्यासाठी झाला पाहिजे भावना गवळीसाठी नाही, असंही त्या वेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT