राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर, काही भागात पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा कडाका असते.
मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली होती. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ थांबल्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मात्र या वेळी वातावरणार अचानक बदल होताना जाणवत आहेत. ख्रिसमसच्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे, तर पुण्यासह महाराष्ट्रात पुढील ४ दिवस तापमानात घट होईल पण त्यानंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होणार. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता शेकऱ्याच्या शेतात गहू, हरभरा अशी हिवाळी पिके आहेत. त्यामुळे थंडी कमी झाल्याने शेतकऱ्याला फटका बसण्याची शक्यता आहे.
आता ढगाळ हवामान कमी झाल्यामुळे, उत्तरेकडच्या वाऱ्याना गती मिळाल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस तपामनात घट होईल. पुढील ४ दिवस तापमानात २ ते ५ डिग्री अंश कमी होईल पण त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होईल कारण बंगालचे उपसागराच्या पाण्याच्या तापमानात मोठी वाढ होताना दिसतेय. ही माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांची दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.