Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update  Esakal
महाराष्ट्र

Weather Update : राज्याच्या अनेक भागात आज बरसणार मुसळधार; हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून दिल्लीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासाभरात दिल्लीत पाणी साचल्याचं चित्र आहे. अशातच आज देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह, कोकण, मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पण सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.

विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीज पडण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

संपूर्ण राज्याला व्यापणाऱ्या मान्सूनने आता उत्तरेकडे आपला प्रवास सुरू केला आहे. काल गुरुवारी (ता. २७) मान्सूनने गुजरात व्यापला असून छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख बहुतांश भाग, बिहार, उत्तर प्रदेशाकडे मजल मारली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : रोहितच्या शिलेदारांचं विधानभवनात मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

Lalu Yadav: ऑगस्टपर्यंतच चालणार मोदी सरकार; लालू प्रसाद यादव यांचा दावा

Rishabh Pant: "तुम्ही माझ्या आईला फोन केला अन्..."; PM मोदींसोबत बोलताना ऋषभ पंतने व्यक्त केल्या भावना

Rahul Dravid : ती वेळ चांगली नव्हती.... पंतप्रधान मोंदीना भेटीवेळी द्रविड वनडे वर्ल्डकप फायनलबद्दल काय म्हणाला?

Team India: ढोल-ताशा अन् लेझीमच्या गजरात रोहितसह टीम इंडियाच्या खेळाडूंचं विधानभवनात स्वागत, पाहा Video

SCROLL FOR NEXT