Weather Update  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather update : राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढणार; राज्याच्या 'या' भागात आज पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील वातावरणामध्ये मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील वातावरणामध्ये मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. तर, काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऐन नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मिचाँग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला आहे, मात्र तरी देखील राज्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे, तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचवेळी राज्याच्या काही भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

देशात परिस्थिती काय?

देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर थंडी आणखी वाढणार आहे. येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात १२ डिसेंबरपासून गारपिटीचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, मुजफ्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसांच्या सरीसह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्ली-एनसीआरच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. रविवारी (10 डिसेंबर) राजधानीचे किमान तापमान 8.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तापमानात आणखी घसरण होईल आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT