Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : पुढील ३-४ तास महत्त्वाचे! आज राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील ३ ते ४ तासांत या भागात पावसाची शक्यता

पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात येत्या ३-४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पुणे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर व काहीसा ओसरला होता. आता पुन्हा मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः ढगाळ राहत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज ह वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवार (ता. २४) नंतर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krushi Purskar 2024: चार वर्षे रखडलेले कृषी पुरस्कार विजेते शेतकरी मुंबई दाखल; पण सुविधांपासून वंचित; शासनाचा अजब कारभार

Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

IND vs BAN, 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही

Dharmveer Movie: ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार ! फडणवीस यांनी का केला मोठा दावा?

SCROLL FOR NEXT