Maharashtra Weather Updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: छत्र्या रेनकोट तयार ठेवा! मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

पुढील 4 दिवस मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसुन येत आहेत. राज्यातील काही भागामध्ये उष्णतेचा तडाखा जाणवत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा पावसाने हजेरी लावली आहे. (Latest Marathi News)

तर जून महिन्याचा शेवट आला असला तरी अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. अशात आता काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.(Latest Marathi News)

दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये काल (शुक्रवारी) मान्सूनचं आगमन झालं आहे. तर पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांसह मुंबईतही काल (शुक्रवारी) सकाळी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत.(Latest Marathi News)

मुंबईत सोमवार आणि मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. पुढच्या 3-4 दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Latest Marathi News)

मान्सून लांबल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. बळीराजा समोर मोठं संकट उभं राहील आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा बळीराजासाठी मोठा दिलासा असणार आहे.(Latest Marathi News)

पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे.(Latest Marathi News)

राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे.(Latest Marathi News)

पुण्यातही पुढील २ ते ३ दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant: 'इम्पोर्टेड माल' प्रकरण अरविंद सावंत यांना भोवलं! शयना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Virat Kohli RCB Captain: विराट कोहली पुन्हा कर्णधारपदी दिसणार का? मुख्य प्रशिक्षक Andy Flower यांनी दिले मोठे संकेत

India Global Mediator: जागतिक मध्यस्थ म्हणून भारताचं स्थान बळकट; BRICS आणि G7 परिषदांमध्ये भारताची भूमिका ठरली महत्वाची

दिवाळीला पत्नी माहेरून आली नाही, नैराश्यातून पतीनं चिमुकल्याला संपवलं, नंतर... घटनेनं खळबळ

Latest Marathi News Updates: अरविंद सावंत यांच्या विरोधात FIR दाखल

SCROLL FOR NEXT