Weather Update News esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार; मुंबई पुण्यात काय असेल स्थिती?

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भांगामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमी दिसून येईल. राज्यात आज तीन जिल्ह्यांमध्येच मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

पुढच्या 4,5 दिवसात कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि पुण्यातही आज कोणताही अलर्ट नसून पावसाचा जोर कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Marathi News)

तर पुणे, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तर काही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेच वरचढ! कोकणात लढवणार सर्वाधिक जागा? भाजप, राष्ट्रवादीला फक्त 'इतक्या' जागा

Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट

Latest Maharashtra News Updates : विदर्भातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

Share Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडले; निफ्टी 25,000च्या वर, कच्च्या तेलात मोठी घसरण

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT