राज्यात मागील काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात ओढे, नाले, नद्या दुधडी भरून वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या राज्यातील पाऊस काही प्रमाणात ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक भागात पूर ओसरण्या, सुरूवात झाली आहे.
मात्र राज्यात कुठेही पुढील 2-3 दिवस रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आलेला नाही. परंतु आज काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
तर 2 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार आहे.
गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. १४ जुलै रोजी राज्यातील धरणात सरासरी ३० टक्के पाणीसाठा होता पण आता सतत पडणाऱ्या पावसामुळे १५ दिवसांत धरणातील सरासरी पाणीसाठ्यात तब्बल २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा बहुतांश जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न संपला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.