rain esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुढच्या ४८ तासात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

पुणे - राज्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली. राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडतील.

सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण-पूर्व झारखंड व परिसरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर पुढील ४८ तासांमध्ये त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून पुढील तीन दिवस अशीच कायम राहणार आहे.

विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुधवारी (ता. २१) कोकणातील सर्वच जिल्हे, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारपासून (ता. २४) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडतील असे हवामान विभागाने सांगितले आहे.

पुणे शहर आणि परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा हजेरी लावली. शहरासह उपनगरांमध्ये दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरात ०.८ मिलिमीटर तर लोहगाव येथे १३.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

येथे जोरदार पावसाचा इशारा

बुधवारी ः पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, पुणे, सातारा, धुळे, नंदूरबार, बुलडाणा, वर्धा,चंद्रपूर, बीड, उस्मानाबाद आदी

गुरवारी ः पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, वाशीम, यवतमाळ

शुक्रवारी ः बुलडाणा

हंगामातील एकूण पाऊस (१ जूनपासून)

ठिकाण ः पाऊस मिलिमीटरमध्ये

पुणे शहर ः ४५९.३

लोहगाव ः ५२७.४

पाषाण ः ४९९.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT