Nashik Rain 
महाराष्ट्र बातम्या

पुण्यासह राज्यात अनेक भागात पाऊस; नाशिकमध्ये पिकांचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे.

मुंबई - राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. पुण्यात (Pune) सोमवारी सायंकाळी ढगाळ हवामान होते. त्यानंतर आज मंगळवारी पुण्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला. धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. बुधवारी ९ मार्चला महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंशाच्या दरम्यान नोंदला जात आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तर, निचांकी तापमानाची नोंद मालेगाव येथे १६.४ अंश सेलसिअ इतकी झाली.

सध्या अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणापासून चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची शक्यता असून पुढील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे, मात्र गुरुवारपासून (ता. १०) विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.

पुण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात ही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या शहर व परिसरात ढगाळ वातावरणाचे सावट कायम असून किमान तापमानात झपाट्याने वाढ तर कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. मंगळवारी शहरात १८.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तर ३४.३ कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसभर ऊन सावलीचा खेळ कायम आहे. तर हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनूसार पुढील चार दिवस शहर आणि परिसरात ही स्थिती अशीच कायम राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यामुळे किमान तापमानात होणारी वाढ यामुळे पुणेकरांना उकाडा देखील अधिक जाणवणार आहे. किमान तापमान हे २० ते २४ अंशांवर पोहचू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT