Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा कहर! उत्तर भारत थंडीने गारठला; आजचं हवामान कसं असेल?

थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी तर काही राज्यात पावसाची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्ली आणि परिसरात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज दिल्लीचं किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे मैदानी प्रदेशातील राज्यांमध्ये आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.(Latest Marathi News)

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान यवतमाळ येथे ८.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

या राज्यात पावसाची शक्यता

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही लक्षद्वीप, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर इतर राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, दाट धुकं पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती

विदर्भात सर्वदूर गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात तापमान घसरल्याने थंडी वाढत आहे. बुधवारी (ता. २०) पूर्व राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये अनेक भागांत किमान तापमान ४ ते ८ अंशांदरम्यान आहे. पंजाबमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुके पडले आहे. राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. (Marathi Tajya Batmya)

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, तसेच दिवसाच्या सरासरीपेक्षा तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. बुधवारी (ता. २०) यवतमाळ येथे ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, सरासरीपेक्षा ५.४ अंशांची घट झाली आहे. यवतमाळसह धुळे येथेही पारा ७.५ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीच्या लाटेची परिस्थिती आहे. कोकणासह दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान अद्यापही १५ अंशांच्या वर आहे. गुरुवारी (ता. २१) विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२, धुळे ७.५, जळगाव ११.७, कोल्हापूर १६, महाबळेश्वर १२.९, नाशिक १४.४, निफाड ११.२, सांगली १५.८, सातारा १५.१, सोलापूर १५.५, सांताक्रूझ २१.२, डहाणू १९.५, रत्नागिरी २४.४.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT