Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात वळवाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात वळवाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. आजही (ता. १७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

काल (गुरुवारी ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमान कमी-जास्त होत आहे.

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT