Cyclone Biparjoy Weather Update 
महाराष्ट्र बातम्या

Cyclone Biparjoy: कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल; ‘बिपरजॉय’ चक्रीवादळनं रौद्र रुप धारण केलं

Cyclone Biparjoy: कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धनश्री ओतारी

Cyclone Biparjoy: कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, मुंबईसह कोकणात पुढील पाच ते सहा दिवस ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी या चक्रिवादळानं पुन्हा एकदा रौद्र रुप धारण केलं आहे. (Weather Updates Cyclone Biporjoy Maharashtra Vidarbha Konkan )

चक्रिवादळाचं हे रौद्र रुप 9 जूनपर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यामुळं गोवा- कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. Weather Updates

हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रातील हे वादळ सध्या 5 किमी प्रतीतास इतक्या वेगानं उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 24 तासांत वादळाचा प्रवास उत्तरेच्या दिशेनं सुरु राहील आणि त्यानंतरच्या तीन ते चार दिवसांमध्ये ते उत्तर वायव्येला जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Weather Updates

हे चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले नसले तरी, समुद्रात आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन, आठ, नऊ आणि दहा जूनला तीव्र होणार आहे. त्याचा फटका कोकण, मुंबई, पालघर आणि गुजरात किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल

राज्याच्या किनारपट्टी भागावरून घोंगावणारं वादळ पुढे सरकत असतानाच विदर्भात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी तापमान 43 अंशांच्याही पलीकडे गेलं आहे. Weather Updates

त्यामुळे राज्यातून उकाडा काही कमी होताना दिसत नाहीये. मुंबई आणि पालघर भागांमध्ये समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे या भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात उकाडा अधिक भासत असतानाच मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहता येणार आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानाच्या धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. थोडक्यात आता संपूर्ण देशाच्या बहुतांश भागांमध्ये वाढणारा हा उन्हाचा दाह पाहता सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. आता हा मान्सून नेमका कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं. Weather Updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT