Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar VS Sharad Pawar: अजितदादांची विरोधी भूमिका, शरद पवारांचं काय चुकलं?

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकारणात मोठी उलाढाल झाली आहे

अक्षता पांढरे

एकनाथ शिदेंनी वर्षभरापुर्वी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड पुकारुन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदेंनी बंड पुकरताना ठाकरेंच्या चुकांचा पाढा वाचून दाखवला. यात हिंदूत्वाचा मुद्दा असेल, ठाकरे वेळ देत नाही असा आरोप असेल. (Latest Marathi News)

त्याच कॉपी पेस्ट आता अजित पवारांनी केलं. ४० आमदारांना सोबत घेतलं आणि भाजपला पाठिंबा दिला. पण अजितदादांच्या या बंडाची कुणकुण कित्येक महिने आधीपासुन सुरु होती. पण शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी नेहमीत पक्षात आलबेल असल्याचं म्हटलं आणि इथेच गफलत झाली. अजित पवारांनी सरकरामध्ये सामील झाल्यानंतर घेतलेल्या सभेत सर्व नेत्यांनी केलेल्या आरोप आणि खुलास्यांमुळे हे चित्र स्पष्ट झालंय.  (Marathi Tajya Batmya)

१) पहाटेचा शपथविधी, पवारांची कबुली,

2019 चा पहाटेचा शपथविधी आपल्या सर्वांच्या चांगलाच लक्षात आहे. महाराष्ट्राची जनता तर गाढ झोपेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी सुद्धा आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्याचं पत्र होतं.(Latest Marathi News)

त्यावेळीही राष्ट्रवादी फुटली अशी चर्चा सुरु होती. अजित पवारांनी पक्षाविरुध्द बंड केलं, अशी चर्चा सुरु झाली. पण अजितदादांनी ४ दिवसांत भूमिका बदलली. पण यावर नंतर वाच्यता करण्यास राष्ट्रवादीतला कोणताही नेता तयार नव्हता. (Marathi Tajya Batmya)

पहाटेच्या शपथविधीचे खापर त्यांच्यावर पडले. अशात देवेंद्र फडणवीसांनी थेट आरोप केला की, पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सहमतीने झाला होता. यानंतर राजकारणात एकचं खळबळ उडाली. पण या आरोपांवर शरद पवारांनी देखील कबुली दिली. पण या दरम्यान अजितदादांची राजकीय प्रतिमा मलिन झाली. पवारांच्या म्हणण्यानुसार मी गुगली टाकली. पण यात गुगलीत अजित दादांचीच विकेट पडली होती.(Latest Marathi News)

२) अजितदादांना डावललं गेलं

अजितदादांना पक्षात डावलल्याच्या अनेक घटना पक्षात घडल्या ज्याचा उल्लेख स्वत: अजितदादांनी केलाय. म्हणजे २००४ ला राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादाचे सरकार आले होते. पण जास्त जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. आता ठरल्याप्रमाणे ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री आणि अशात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी अजित दांदांचे नाव समोर येत होते. (Marathi Tajya Batmya)

पण पवारांनी मुख्यमंत्रीपद डावलुन महत्वाची पद आपल्याकडे घेतली आणि राष्ट्रवादीची त्यातही अजितदादांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली आणि आजही अजितदादा ती खंत व्यक्त करतात. मुख्यमंत्री होण दादांची इच्छा आहे. आणि ती त्यांनी कित्येकदा बोलुन दाखवली.(Latest Marathi News)

त्यानंतर नुकताच १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ वा वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यासोबत काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. मात्र यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या अजित पवारांवर कोणतीही नवीन जबाबदारी नव्हती.  (Marathi Tajya Batmya)

एवढचं नाही त्यानंतर २१ जूनला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होता. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छा बोलुन दाखवली. मला विरोधपक्षनेते पद नको, संघटनात्मक कोणतेही पद द्या, भलेही ते शिपायचा का असेना. (Marathi Tajya Batmya)

कारण जयंत पाटील हे गेल्या ५ वर्षांपासुन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या नियमानुसार ३ वर्षांनी प्रदेशाध्यक्ष बदलला जातो. पण जयंत पाटील हे पवारांच्या जवळचे असल्याने निवडणूका होत नव्हत्या असा आरोप काही नेत्यांनी केला.(Latest Marathi News)

यावर शरद पवारांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. म्हणून अजितवपवार आणि त्यांच्या सर्मथकांनी ३१ जूलै पर्यंतचा अल्टिमेटम दिला. पण शरद पवारांनी तो पाळला नाही. त्यामुळे अजितपवारांची नाराजी आणखी वाढली. (Marathi Tajya Batmya)

३) प्रफुल्ल पटेल यांची पिछेहाट

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर आधी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यामुळे भविष्यात पक्षाचे अध्यक्षपद हे प्रफुल्ल पटेलांकडे आलं असत. एवढचे नाही, जेव्हा पवारांनी जेव्हा राजीनामा दिला होता तेव्हा प्रफुल्ल पटेलांकडे सुत्र दिली जाणार यांची दाट शक्यता होती. पण १० जूनच्या वर्धापनदिनाच्या दिवशी पवारांनी भाकरी फिरवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली.(Latest Marathi News)

आता प्रफुल्ल पटेल हे सुप्रिया सुळेंपेक्षा जास्त अनुभवी नेते आहेत. दिल्लीतील राजकारणाची त्यांना फार जवळुन माहिती आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्ष बनवण्याऐवजी कार्यकारी अध्यक्ष बनवलं तेही सुप्रिया सुळें सोबत वाटुन याचं प्रफुल्लांना वाईट वाटलं. (Marathi Tajya Batmya)

४) सुप्रियी सुळेंना कार्यकारी अध्यक्ष

१० जूनच्या वर्धापनदिनाच्या दिवशी पवारांनी भाकरी फिरवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. पण पवारांच्या या निर्णयावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.(Latest Marathi News)

पक्षात इतर अनुभवी नेते असुनही पक्षाचे भविष्य पवारांनी आपल्या मुलीच्या हातात देऊन त्यांचे राजकीय भविष्य सेटल करण्याचा प्रयत्न केला. आता कार्यकारी अध्यक्ष म्हंटल्यावर पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सुप्रिया सुळे यांच्याकडे आले असते पण त्यामुळे अनुभवी नेत्यांना डावलण्यात आले. (Marathi Tajya Batmya)

५) पवारांची बदलती भूमिका

पवारांच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांचा राजकीय बळी गेला, असा आरोप अजितदादांनी केला. यातली उदाहरण देताना दादांनी सांगितलं, २०१४ चा भाजपला दिलेला पाठिंबा, पवारांनी स्वत : आपल्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांना शपथविधिसाठी पाठवलं होतं. पण त्यानंतर अचानाक पाठिंबा काढून घेतला.(Latest Marathi News)

यानंतर अजितदादांनी २०१७ चा किस्सा सांगितला. त्यावेळी वर्षा बंगल्यावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु होती. जागावाटप देखील ठरलेलं. पण भाजपची अट होती की, आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. पण पवारांनी शिवसेनेचा जातीयवादी म्हणून उल्लेख करत शिवसेना असेल तर आम्ही सरकारमध्ये सामील होणार असं म्हंटलं त्यामुळे ही बोलणी तिथेच फिस्कटली. (Marathi Tajya Batmya)

त्यानंतर २०१९ चा पहाटेचा शपथविधी ज्याला पवारांचा पाठिंबा होता. मात्र नंतर तो पाठिंबा काढून घेतला. एवढचं नाही दादांच्या म्हणण्यानुसार शिदेंच्या बंडावेळी देखील राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत जाण्याविषयीचे संमती पत्र दिले होते. तशी बोलणी सुद्धा सुरु झाली. पण दादांच्या म्हणण्यानुसार साहेब आम्हाला दिल्लीला आणि चर्चेसाठी इंदोरला पाठवायला तयार नव्हते, कारण माध्यमांना या गोष्टी समजतील आणि हट्टापायी हे समीकरण होऊ शकले नाही.(Latest Marathi News)

त्यात २०१९ ला शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. ज्यांच्यासोबत २०१७ ला सरकार स्थापन करायला तयार नव्हते. पण यामुळे पक्षातील नेते नेहमी तोंडावर पडायचे. ही आणि अशी अनेक कारणांमुळे आज अजित पवार यांच्यासोबत मोठा गट राष्ट्रवादीतुन बाहेर पडला. आता दोन्ही गट आपली विभागलेली ताकद कशी वाढणार, हे पाहणं महत्वाच ठरेल. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT