Shinde Vs Thackeray : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली आहे. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होणार आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. यामध्ये सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एमआर शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पीएस नरसिम्हा यांचा समावेश आहे.
देशातील सर्वात मोठे न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेतील आणि सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायची की पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठामार्फत सुनावणी करायची हे ठरवेल. दरम्यान आजच्या सुनावणीतल महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया...
उपाध्यक्ष आमदारांवर अपात्रतेची कारवाई करु शकतात - कपिल सिब्बल
आमदार अपात्र ठरवल्यानंतर त्यांना दाद मागता आली असती, मात्र शिंदे गटाचे आमदार परत आले नाहीत - कपिल सिब्बल
१० व्या सुचीचा शिंदे गटातील आमदरांकडून गैरवापर झाला - कपिल सिब्बल
नबाम रेबिया प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी पदाचा गैरवापर केला - कपिल सिब्बल
अध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याने आमदार अपात्र ठरले - कपिल सिब्बल
मंत्रिमडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल अधिवेशन बोलवू शकत नाहीत, अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना नाही - कपिल सिब्बल
परिच्छेद ३ मध्ये पक्षाअंतर्गत फूट झाल्यास विभाजन होते - कपिल सिब्बल
सध्याच्या सरकारकडे असणारे बहुमत असंवैधानिक - कपिल सिब्बल
नबाम रेबिया केसमध्ये भाजपने त्यांचा विधानसभा अध्यक्ष बनवला - कपिल सिब्बल
आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नोटिस बजावली होती, मात्र ते हजर राहीले नाहीत - सिंघवी
उपाध्यक्षांनी आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेतला - सिंघवी
रेबिया प्रकरणात आमदारांना अपात्र करताना नोटीस देण्यात आली नव्हती - सिंघवी
आमदारांना ७ दिवसांची नोटीस देण्यात आली होती, उपाध्यक्षांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला - सिंघवी
नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्राच्या प्रकरणाशी लागू होत नाही - सिंघवी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.