Devendra Fadnavis and Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदे तुमच्याबरोबर नसतील तर काय होईल? 'त्या' व्हिडिओमुळे युतीतील मदभेद चव्हाट्यावर

माढा लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख कोकाटेंच्या व्हिडिओमुळे युतीतील मदभेद चव्हाट्यावर

अंकिता खाणे (Ankita Khane)

‘भाजपच्या सर्व नेतेमंडळींना माझी विनंती आहे की, आपण सर्व सर्व्हे पाहिलेले आहेत. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर नसतील तर काय होईल याचा विचार आपण करावा आणि आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करावी. आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्हाला गोडीत समजून घ्या. आमचीही चार कामे करा. हवेत उडण्याचे बंद करा. आपण एकटेच सत्तेत असल्याचा आविर्भाव सोडा. सर्व मित्रपक्षांना एकत्र घेऊन काम करा...’ या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, शिवसेना- भाजप युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.(Latest Marathi News)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असहकार करण्याचा ठराव कल्याण येथील भाजपने केला असून, या ठरावाचा निषेध माढा लोकसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे केला आहे. एवढेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात भाजप हा शिवसेना कार्यकर्त्यांवर करीत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना युतीतील धुसफूस उघड झाली आहे.(Marathi Tajya Batmya)

यासंदर्भात संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी सोशम मीडियावर व्हिडिओ क्लिप प्रसारित केली असून, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही भाजपचा खूप अन्याय सहन करतो. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे वेळ देत नाहीत. (Marathi Tajya Batmya)

संजय गांधी निराधार सारख्या कमिट्या झालेल्या नाहीत. आमची कुठली कामं होत नाहीत. फक्त भाजपचे काम करा, असा अलिखित आदेश प्रशासनाला दिलेला आहे. माढा लोकसभेमध्ये आम्ही जीवाचे रान करून आमच्यावर २५-३० वर्षे अन्याय झाला तरीही आम्ही भाजपचा खासदार निवडून दिला. परंतु भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही ज्यांचा विरोध पत्करून काम केलं, त्याच मंडळींना बरोबर घेतले जात आहे. त्यांना ताकद दिली जाते, असा आरोपही संजय कोकाटे यांनी केला.(Latest Marathi News)

‘भविष्यात आमच्या मदतीची अपेक्षा करू नका...’

उद्या कदाचित भाजपची अंतर्गत भांडणं मिटतील, परंतु शिवसेना, मित्रपक्ष येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या उमेदवाराचा खासदारकीला प्रचार करतील असे मला वाटत नाही. आम्हाला काही अपेक्षा नाही. कुठलेही काम आमचं झालेले नाही. (Latest Marathi News)

साध्या पत्रासाठी सुद्धा आम्हाला दहा दहा वेळा फोन करावे लागतात. तरीही आमची तक्रार नाही. ज्यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं तीच मंडळी त्या विरोधकांना बरोबर घेऊन फिरणार असाल तर भविष्यामध्ये आमच्या मदतीची अपेक्षा करू नका, असा इशारा संजय कोकाटे यांनी दिला.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT