What is Cross Voting Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cross Voting: क्रॉस व्होटिंग म्हणजे काय? ज्याच्या जीवावर शक्यता नसतानाही जिंकता येते निवडणूक

MLC Election: राज्यसभा आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत 1998 मध्ये पहिल्यांदा क्रॉस व्होटिंग झाले होते.

आशुतोष मसगौंडे

राज्यात आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहे. या 11 जागांवर 12 उमेदवार मैदानात असल्यामुळे प्रत्येक पक्ष आपआपले उमेदवार निवडून आणण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या आमदारांची मते आपल्या पारड्यात पाडण्याच्या प्रयत्नात आहे.

या सर्व घडामोडीत, काँग्रेसच्या काही आमदारांनी काल पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान क्रॉस व्होटिंगमुळे आजपर्यंत अनेक अपक्ष उमेदवार आणि संख्याबळ नसलेले पक्ष अशक्य वाटणाऱ्या निवडणुका जिंकले आहेत.

या पार्श्वभूमिवर आपण जाणून घेऊया की, विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये होणारे क्रॉस व्होटिंग म्हणजे काय असते.

क्रॉस व्होटिंग म्हणजे काय?

विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदार असतात. त्यावेळी प्रत्येक पक्ष आपला आमदार कोणाला मतदान करणार याचा व्हीप काढतात. त्यानंतर पक्षाने निवडलेल्या विधिमंडळ नेत्याला दाखवून हे आमदार मतदान करतात. जेव्हा एखादा आमदार पक्षाने सांगितलेल्या उमेदवाराऐवजी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतो तेव्हा त्याला क्रॉस व्होटिंग असे म्हणतात.

पहिल्यांदा क्रॉस व्होटिंग कधी झाले?

राज्यसभा आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत 1998 मध्ये पहिल्यांदा क्रॉस व्होटिंग झाले होते. त्यावेळी काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर खुल्या मतपत्रिकेचा नियमही लागू करण्यात आला. या नियमामुळे राज्यसभा आणि विधान परिषद तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करताना प्रत्येक आमदाराला आपले मत पक्षाच्या नेत्याला दाखवावे लागते, मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरूच आहे.

दरम्यान 2022 मध्ये राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले होते. त्यानंतर पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे आमदारांनी गुवाहटीला जात सत्ता बदल केला होता.

क्रॉस व्होट करणाऱ्यांवर काय कारवाई होते?

जर पक्षाला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदाराबद्दल माहिती मिळाली तर तर ते त्याच्यावर कारवाई करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये पक्ष संबंधीत आमदाराची हकालपट्टी करू शकतो.

दरम्यान 2017 मध्ये गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत दोन आमदारांनी अमित शहा यांना मतपत्रिका दाखवत मतदान केले होते. यानंतर काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने ही मते अवैध ठरवली होती. यानंतर काँग्रेसचे अहमद पटेल राज्यसभेचे खासदार झाले होते.

विधान परिषद निवडणुकीत काय घडले?

राज्यात काल विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे शेपकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला, तर महायुती जास्तीची एक जिंकण्यात यशस्वी ठरली.

दरम्यान 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काही काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. आणि आताही काँग्रेसचे काही आमदार फुटल्याने महाविकास आघाडीला फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT