Lakhanbhaiya Fake Encounter Case  
महाराष्ट्र बातम्या

Lakhanbhaiya Fake Encounter Case : पोलीस उचलून घेऊन गेले, अन्...; नेमकं काय आहे 'लखन भैय्या फेक इन्काउंटर' प्रकरण?

Lakhanbhaiya Fake Encounter Case : या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि यांची निर्दोष मुक्तता रद्द केली असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

रोहित कणसे

Lakhanbhaiya Fake Encounter Case Latest News : इन्काउंटर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यावर आधारीत अनेक चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. मात्र पोलीसांनी केलेल्या इन्काउंटवर अनेक वेळा वेगवेगळ्या शंका देखील घेतल्या जातात. या दरम्यान अशाच एका २००६ सालच्या बहुचर्चित लखन भैय्या फेक इन्काउंटर केसमध्ये आज मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि यांची निर्दोष मुक्तता रद्द केली असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली असून. ट्रायल कोर्टाने 13 अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या साखळीच्या आधारे त्यांना दोषी ठरवले आहे. एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याकांडातीलही आरोपी आहेत.

लखन भैय्या इन्काउंटर प्रकरण काय आहे?

लखन भैय्या याला गँगस्टर छोटा राजन याचा साथिदार मानले जात होते. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलीसांनी सांगितले की त्यांनी एका इन्काउंटरमध्ये आरोपी लखन भैय्या याला ठार केलं. मात्र त्याच्या भाऊ राम गुप्ता यांनी माध्यमांसमोर येत पोलीस त्यांच्या भावाला उचलून घेऊन गेल्याची माहिती दिली. तसेच या संबंधीची इतर पुरावे देखील त्यांनी उघड केले.

इतकेच नाही तर राम प्रसाद यांनी कोर्टात धाव घेतली, त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि हे इन्काउंटर फेक असल्याचं समोर आलं. २०१३ मध्ये मुंबईच्या सेशन कोर्टाने २१ लोकांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी देखील होते.

या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह 22 लोक आरोपी होते. या प्रकरणात प्रदीप शर्मा घटनास्थळी हजर नव्हते असा दावा करण्यात आला होता. पण लखन यांच्या कुटुंबियांकडून यासंबंधीचे अनेक पुरावे देण्यात आले. तसेच बॅलेस्टिक रिपोर्टमधून तीन पैकी एक गोळी प्रदीप शर्मा यांच्या बंदूकीतून चालवली गेल्याचे स्पष्ट झालं होतं.

पोलीसांविरोधात फॅक्स ठरला महत्वाचा पुरावा!

लखन गुप्ताच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, पोलिसांनी लखनला त्याच्या घरातून उचलून नेले आणि नंतर त्याचे एन्काउंटर झाल्याचे दाखवले. या प्रकरणी फॅक्सची प्रत पोलिसांविरुद्ध महत्त्वाचा पुरावा ठरली. लखनचा भाऊ राम यांनी त्यांच्या वकील मित्राच्या मदतीने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्तांना फॅक्स पाठवला होता. ज्यात लिहिले होते की, काही वेळापूर्वी पोलिसांनी त्याच्या भावाला घरातून उचलून नेले होते. या महत्त्वाच्या पुराव्यामुळे 14 पोलीस या प्रकरणात अडकले.

या चकमकीत मारल्या गेलेल्या लखन भैय्या वर 19 गुन्हे दाखल होते, त्यापैकी 12 खुनाशी संबंधित होते. लखन भय्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करत असे, पण बनावट चकमकीची तक्रार आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 2008 मध्ये या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी सुरू केली. 2009 मध्ये त्यांनी आपला अहवाल कोर्टात सादर केला आणि त्यानंतर 2010 मध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT