कोणती फळे खावीत ? fruit wintter season sakal
महाराष्ट्र बातम्या

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला असताना या ऋतूत वर्षभर ऊर्जा देणारे पौष्टिक लाडू अन् पदार्थ आहारात असावेत. हा आहार वर्षभर ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरतो. थंडीच्या दिवसात जठराग्नी अधिक प्रदीप्त झालेला असतो. त्यामुळे भूक वाढलेली असते.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला असताना या ऋतूत वर्षभर ऊर्जा देणारे पौष्टिक लाडू अन् पदार्थ आहारात असावेत. हा आहार वर्षभर ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरतो. थंडीच्या दिवसात जठराग्नी अधिक प्रदीप्त झालेला असतो. त्यामुळे भूक वाढलेली असते. चांगल्या भूकेमुळे अन्न पचन होऊ सप्तधातूचे पोषण होऊन शरीराला वेगळी मजबुती मिळते. तसेच थंडीने वातावरण आल्हाददायक असून उत्तम व्यायामाने ऊर्जा अधिक वाढते. त्यासाठी हिवाळ्यात सकाळी उत्तम गुणांनी मोठी ऊर्जा देणारा पौष्टिक लाडू कुटुंबातील प्रत्येकाला द्यायला हवा. सर्व वयोगटासाठी हा आहार उपयुक्त ठरतो.

1. (डिंक लाडू)

हे लाडू हाडाला मजबुती देणारे ठरतात. अशक्तपणा दूर होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते. सांध्यातील स्नायू मजबूत होतात. वर्षभराची रोगप्रतिकारक्षमता राखण्यासाठी हे डिंक लाडू खाण्याची परंपरा आहे. बाभळीच्या ताज्या डिंकापासून हा लाडू बनवलेला असावा. त्यात खजूर, मनुका, गुळाचा वापर केल्यास उत्तम ठरते.

-------------------------------------------------------------------------------------

2. (च्यवनप्राश)

आवळ्यापासून बनवलेले हे एक रसायन आहे. जे की वाढत्या वयात तारुण्य टिकवते. तसेच शरीरक्षमतादेखील मजबूत करते. सर्व वयोगटातील लोकांना च्यवनप्राशन उत्तम आहे. वर्षभर च्यवनप्राश आहारात असायला हवा पण नसेल तर निदान थंडीच्या दिवसापासून सुरवात करण्यास हरकत नाही.

------------------------------------------------------------------------------------

3. (शतावरी कल्प)

शतावरी कल्प हे देखील एक रसायन आहे. विशेषतः महिलांसाठी वापरले जाते. पण प्रत्यक्षात लहान मुले व मुलींना त्याचा वापर करणे उत्तमच ठरते. या दिवसात त्याचा वापर करण्यास हरकत नाही.

-----------------------------------------------------------------------------------

4. (मेथी लाडू)

मेथी लाडू हे कटू पौष्टिक मानले जातात. मधुमेहीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. मेथीचे दाणे सांध्यातील वेदना, सूज कमी करतात. तसेच लहानमुलांची हाडे बळकट करतात.

---------------------------------------------------------------------------------

5. (उडीद लाडू)

उडीद दाळ ही पौष्टिक दाळ मानली जाते. ही एकमेव दाळ आहे की जीचा उपयोग हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.

--------------------------------------------------------------------------------------

6. (अळीव लाडू)

अळीव हे उत्तम पोषक असून त्यात प्रथिने, लोह, कॅल्शिअम, फॉलीक ॲसीड, क व ई जीवनसत्त्व असते. त्यामुळे अळीव लाडवाचा समावेश पौष्टिक लाडूमध्ये केला जातो.

----------------------------------------------------------------------------------------

7. (ज्येष्ठांसाठी रेसीपी)

ज्येष्ठ नागरिकांसाठी पौष्टिक लाडू बनवत असताना आधी उडीद दाळ भाजून घ्यावी. भाजलेल्या पदार्थ बारीक करून पावडर बनवून त्याचे लाडू करावेत. त्यामुळे ते सहज पचवता येणे शक्य होऊ शकते.

खाद्यपदार्थांचा सुकामेवा, खजूर, डिंकाचा वापर असावा

हिवाळ्यातील ऋतुमान हे शरीर पृष्टी करणारे असते. या काळात सकाळी लवकर उठून व्यायाम, फिरणे आदी गोष्टी करून जठराग्नी वाढलेला असतो. त्यासाठी उत्तम असे सुकामेवा, खजूर, डिंक असे खाद्यपदार्थांचा वापर आहारात करणे गरजेचे आहे.

- प्रा. डॉ. शांतीनाथ बागेवाडी, शेठ रावजी गोविंदजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

-------------------------------------------------------------------------------------------------

हिवाळ्यात असावा असा आहार

हिवाळ्यात सकाळी उपाशीपोटी पौष्टिक लाडूचा आहार घेऊन त्यानंतर कोमट दूध घेणे उत्तम ठरते. किमान हिवाळ्यात तरी हा आहार असायला हवा.

- डॉ. महेश बेलुरे, श्री सिद्धेश्वर आयुर्वेद क्लिनिक, विजापूर रोड, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: फेड रिझर्व्ह ते डॉलर इंडेक्स...'या' 5 कारणांमुळे शेअर बाजार आणखी कोसळणार; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

SCROLL FOR NEXT