Whats App Channel: मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अलीकडेच टेलीग्राम प्रमाणेच एक नवीन चॅनेल फिचर निर्माण केले आहे. या फीचरच्या मदतीने सेलिब्रिटी स्वतःचे व्हॉट्सअॅप चॅनल तयार करू शकतात आणि सामान्य वापरकर्ते त्यांच्याशी थेट कनेक्ट होऊ शकतात.
WhatsApp ने चॅनेलमध्ये सर्च फिचर देखील समाविष्ट केले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या कंटेट क्रिएटर्स, व्यवसाय किंवा सेलिब्रिटींनी तयार केलेले चॅनेल शोधण्यात मदत करते.
एवढेच नाही तर युजर्सना क्रिएटर्सच्या मेसेजवर रिअॅक्ट करण्याची सुविधाही मिळते. आता पीएम मोदींसोबतच इतर अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांनीही स्वतःचे चॅनल तयार केले आहेत. 'सकाळ' वृत्तसंस्थेनेही आपलं व्हॉट्सअॅप चॅनल सुरु केलं आहे. त्यामुळे देशभरातील बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी सकाळच्या व्हॉट्सअॅप चॅनलला फॉलोव करा.
सकाळचं व्हॉट्सअॅप चॅनल कसं शोधाल?
या फिचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधी तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट कराव लागेल. त्यानंतर स्टेटस ज्या ठिकाणी बघतात त्या ठिकाणी फाईंड चॅनल असा पर्याय दिसेल. त्या ठिकाणी 'सकाळ' असं सर्च करा. त्यानंतर तेथे (+) या चिन्हावर क्लिक करा. चॅनल जॉईन केल्यानंतर देशभरातील राजकीय, मनोरंजन, क्रीडा इ. क्षेत्रातील बातम्या सर्वात आधी बघायला मिळतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.