Amol Mitkari and Chandrakant Patil
Amol Mitkari and Chandrakant Patil Amol Mitkari and Chandrakant Patil
महाराष्ट्र

Amol Mitkari: "चंद्रकातदादा पालकमंत्री असताना ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरु होत्या"; मिटकरींचा खळबळजनक आरोप

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : चंद्रकात पाटील हे पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या आशीर्वादानं ड्रग्जसारख्या घटना पुण्यात व्यवस्थित सुरु होत्या, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे. चंद्रकात पाटलांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. (When Chandrakat Patil was Guardian Minister of Pune drug incidents were well underway Amol Mitkari sensational allegation)

चंद्रकात पाटील काय म्हणाले होते?

पुण्यातील फर्ग्युसन रोड येथील एका बारमध्ये अल्पवयीन मुलांकडून ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं शहरातील गैर प्रकारांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

यावरच प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी म्हटलं होतं की, "मी पालकमंत्री असताना कधी अशा घटना घडल्या नाहीत. घडल्या आहेत का ते आठवत नाही. तुम्हालाही आठवत नसेल. पुण्याची लोकसंख्या फार पूर्वी १४ लाख होती ती आता ७० लाख झाली आहे. त्यामुळं सहाजिकच शहरात गर्दी वाढली आहे. पण पोलिसांनी अशा घटना घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे. पण विरोधकांनी आरोप करताना एखाद्या मंत्र्याचा त्यात हात असल्याचा आरोप करणं चुकीचं आहे"

अमोल मिटकरींनी काय दिलं प्रत्युत्तर?

अजित पवारांचा थेटपणे चंद्रकांत पाटलांनी उल्लेख केलेला नसला तरी सध्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि आत्ताच पुण्यात ड्रग्जची प्रकरण समोर येत आहेत. याच्या संदर्भात अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत दादांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की,"पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळं या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

Aditya-L1 :इस्रोच्या Aditya-L1 ने केली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण; सूर्याबद्दल जगाला कळणार ही आश्चर्यकारक माहिती

Electricity Theft : अबब...मराठवाड्यामध्ये वर्षभरात ३२ कोटी रुपयांची वीजचोरी उघड!

VIDEO: भारतीय लष्कर नसतं तर भाविकांची बस दरीत कोसळली असती; पाहा थरारक व्हिडिओ

NEET Exam : नीट परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी दोघे सीबीआयच्या ताब्यात; लातूरमधल्या 'त्या' तिघांचं काय आहे कनेक्शन?

SCROLL FOR NEXT