Monsoon Assembly Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हसन मुश्रीफांची ओळख करुन देताच सभागृहात 'जय श्रीराम'चे नारे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कामकाजाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांचा परिचय करुन दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या 9 नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. पहिल्यांदा अजित पवारांची ओळख करून देताना जयंत पाटील यांनी मिश्किलपणे 'त्यांची-आमची जुनी ओळख आहे' म्हणत कमेंट केली आहे. जयंत पाटील यांच्या बोलण्याने सभागृहात हशा पिकला. इतर नेत्यांसह अजित पवारांच्याही चेहऱ्यावरही हसू उमटले!(Latest Marathi News)

तर पुढे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा परिचय करुन देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसं त्यांचं नाव घेतलं, त्यानंतर आमदारांनी 'जय श्रीराम'च्या दोन ते तीन वेळा घोषणा दिल्या. त्यांचे नाव घेतल्यानंतर ते उठले त्यांनी हात जोडले आणि सभागृहातील इतर नेत्याकडे पाहिलं स्मितहास्य केलं आणि ते खाली बसले.(Latest Marathi News)

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील नव्या मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करुन दिला. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परिचय मुख्यमंत्र्यांनी करुन दिला. यावेळी भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी बाकं वाजवली. दुसऱ्यांदा छगन भुजबळ, नंतर दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर हसन मुश्रीफ यांचं नाव मुख्यमंत्र्यांनी परिचयासाठी पुकारलं.तेव्हा 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या.(Latest Marathi News)

हसन मुश्रीफ यांचं नाव परिचयासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलं, तशा दोन ते तीन वेळ 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या गेल्या. सभागृहात नेमक्या कोणत्या पक्षाच्या आमदारांनी या घोषणा दिल्या आहेत हे समजू शकलेलं नाही, परंतु मुश्रीफांच्या परिचयावेळीच या घोषणा देण्यात आल्या आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT