MPSC Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

‘MPSC’कडून कधी जाहीर होणार वार्षिक वेळापत्रक? 2024मध्ये एकही परीक्षा नाही, २०२५चे वर्षाचे वेळापत्रकही गुलदस्त्यात; परीक्षार्थींची ‘एमपीएससी’वर नाराजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार २०२४ मध्ये एकही पूर्व परीक्षा झालेली नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये अपेक्षित असलेली महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता १ डिसेंबरला घेण्याचे नियोजित आहे. हजारो रुपयांचा खर्च करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याने त्यांनी आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार २०२४ मध्ये एकही पूर्व परीक्षा झालेली नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये अपेक्षित असलेली महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता १ डिसेंबरला घेण्याचे नियोजित आहे. हजारो रुपयांचा खर्च करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याने त्यांनी आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ पासून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नसल्याची स्थिती आहे. २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. २०२४ या वर्षातील ११ महिने संपत असताना देखील आयोगाच्या माध्यमातून एकही पूर्व परीक्षा झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांचे अख्खे वर्ष वाया गेले आहे. आयोगाच्या जाहिरातीनुसार १ एप्रिल ही वयोगणनेची तारीख ग्राह्य धरली जाते.

आयोगाकडून २०२५ चे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. २०२४ मधील उर्वरित पूर्व परीक्षा जानेवारी व फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहेत. मात्र, २०२४ च्या परीक्षा उशिरा होत असल्याने २०२५ च्या परीक्षा तरी किमान आयोगाने एप्रिल २०२५ पासून घेण्यास सुरवात करावी, अशी उमेदवारांची मागणी आहे. दरम्यान, दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर होणारे आयोगाचे वार्षिक वेळापत्रक अजूनही जाहीर झालेले नाही. ते कधीपर्यंत जाहीर होईल, याबाबत आयोगातील वरिष्ठ गप्पच आहेत. ‘वेळापत्रक लवकरच जाहीर होईल’ एवढेच उत्तर त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले.

आयोगाच्या नियोजित परीक्षा

  • १ डिसेंबर २०२४ रोजी : राज्य सेवा पूर्व परीक्षा

  • ५ जानेवारी २०२५ : संयुक्त पूर्व परीक्षा गट ब (४८० पदे)

  • २ फेब्रुवारी २०२५ : संयुक्त पूर्व परीक्षा गट क (एक हजार ३३३ पदे)

आयोगातील सर्वच सदस्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार परीक्षार्थी तयारी करत असतात. आयोगाने जाहीर केलेल्या वार्षिक कॅलेंडरप्रमाणे सर्व परीक्षांचे नियोजन करून त्याच वेळेत सर्व परीक्षा अपेक्षित आहेत. वार्षिक वेळापत्रकानुसार कार्यवाही होत नसल्याबद्दल आयोगाच्या सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेळापत्रकानुसार परीक्षा व्हायलाच हव्यात, असे आदेशही त्या सर्वांनी सचिवांना दिले आहेत. त्यामुळे २०२५ मधील वेळापत्रकाची तरी प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, अशी सर्वांनाच आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT