solapur mahapalika sakal
महाराष्ट्र बातम्या

कधी मिळणार दररोज पाणी? पावसाळ्यातही सोलापूरकरांना 4-5 दिवसांआडच पाणी; पहाटे चार ते रात्री साडेबारापर्यंत; निवडणुकीपूर्वी प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न

उन्हाळा असो की पावसाळा, सोलापूरकरांना १२ ते १५ वर्षांपासून दररोज पाणी मिळत नाही. सध्या उजनीची प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू असून चिंचपूर, औज बंधारे भरले आहेत. हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरू लागला आहे. तरी सोलापूर शहराला चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय.

तात्या लांडगे

सोलापूर : उन्हाळा असो की पावसाळा, सोलापूरकरांना मागील १२ ते १५ वर्षांपासून दररोज पाणी मिळत नाही. सध्या उजनी धरणाची प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू असून चिंचपूर, औज बंधारे भरलेले आहेत. हिप्परगा तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरू लागला आहे. तरीदेखील सोलापूर शहराला सध्या चार व पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय, हे विशेष.

सोलापूर शहरासाठी पहिल्यांदा १८८५मध्ये होटगी तलावावरून सिमेंट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यात आले. त्यानंतर १९३२ मध्ये शहरांतर्गत गावठाण भागात जलवाहिनी टाकण्यात आली. १९९६ मध्ये उजनीवरून सोलापूर शहरासाठी जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात आले. त्यानंतर आता समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. दरम्यान, अंदाजे १५ वर्षांपासून सोलापूरकरांना प्यायला सुद्धा दररोज पाणी मिळालेले नाही.

सुरवातीला एक-दोन दिवसाआड, नंतर तीन दिवसाआड आणि आता तर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. शहराचा विस्तार होत असताना वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून पाणीपुरवठ्याचे ठोस नियोजन अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून जगभरात पोचलेले सोलापूरकर आजही चार-पाच दिवसाआड पाणी भरतात अशी वस्तुस्थिती आहे. मग, उजनी, औज, चिंचपूर, हिप्परगा पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही अशीच स्थिती आहे.

निवडणुकीपूर्वी प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न

विधानसभा निवडणुकीचा बिगूल १५ सप्टेंबरनंतर वाजणार असून आमदारकीसाठी ऑक्टोबरमध्ये मतदान होईल. नोव्हेंबरमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर तीन ते चार महिन्यातच म्हणजेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. तत्पूर्वी, सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवावाच लागणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सरू आहेत.

उजनी पूर्ण भरल्यावर चार दिवसाआड पाणी

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर संपूर्ण सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावेळी विजेचाही अडथळा असणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या नेतृत्वात सध्या समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठ्याचे दिवस आणखी कमी होतील, असा त्यांना विश्वास आहे.

शहरातील पाण्याच्या वेळा

  • पहाटे चार ते रात्री साडेबारापर्यंत

  • ९८ चावीवाल्यांवर पाणी सोडण्याची जबाबदारी

  • पाण्याच्या ६२ टाक्यांवरील वॉल रिमोट तथा बटणांवर

दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन

नोव्हेंबरमध्ये समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर त्याच महिन्यात ट्रायल घेतली जाणार आहे. त्यानंतर सोलापूर शहराला किमान दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असा विश्वास आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

- व्यंकटेश चौबे, प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT