महाराष्ट्र बातम्या

Navratri Utsav Special: महाराष्ट्र विधानसभेत जनतेचा आवाज पोहोचवणाऱ्या या आहेत २४ महिला आमदार !

सकाळ डिजिटल टीम

Navratri Utsav 2023 : रविवार १५ ऑक्टोबरपासून संपूर्ण जगात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नवरात्र उत्सव म्हणजेच आदिशक्तीचा जागर. अश्यावेळी नवरात्र उत्सवानिमित्त जाणून घेऊया महाराष्ट्राच्या विधानसभेत नक्की किती महिला आमदार आहेत.

विद्या ठाकूर

विद्या ठाकूर या भारतीय जनता पक्षाच्या आमदार असून त्या गोरेगाव विधानसभेच्या आमदार आहेत. 48,907 मतांनी त्या विजयी झाल्या. त्या भाजपच्या उत्तर भारतीय चेहरा आहेत. १९९२ साली त्या मुंबईमध्ये नगरसेविका होत्या.

सीमा हिरे

सीमा हिरे या २०१९ साली दुसऱ्यांदा आमदार झाल्या. नाशिक पश्चिममधून त्या भाजप कडून निवडून आल्या. त्या नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. भाजप नेते पोपटराव हिरे यांच्या त्या सून आहेत.

सुमन पाटील

राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या २०१९ साली पुन्हा एकदा निवडून आल्या . या आधी त्या २०१५ साली पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. तासगाव मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.

मोनिका राजळे

शेगाव मतदार संघातून मोनिका राजळे या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आल्या.

यशोमती ठाकूर

तेओसा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून यशोमती ठाकूर या सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी आपला बालेकिल्ला राखला.

श्वेता महाले

भारतीय जनता पक्षाकडून चिखली मतदारसंघातून श्वेता महाले या निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या विद्यमान आमदार असलेले राहुल बेंद्रे यांचा पराभव केला.

नमिता मुंदडा

कैज मतदार संघातून नमिता मुंदडा या भारतीय जनता पक्षाकडून निवडून आल्या. या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या सासू असलेल्या विमल मुंदडा यांचा पराभव केला.

प्रतिभा धनोरेकर

काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धनोरेकर यांनी वरोरा मतदारसंघातून विजय मिळवला. याआधी त्यांचे पती या ठिकाणी आमदार होते.

मेघना बोर्डीकर

भारतीय जनता पक्षापासून मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर मतदारसंघातून निवडून येत मोठी बाजी मारली. परभणी जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. त्या साडेतीन हजारहून अधिक मतांनी विजयी झाल्या.

अदिती तटकरे

श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत व राज्याच्या मंत्री देखिल आहेत.

प्रणिती शिंदे

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या आमदार म्हणून निवडून आल्या. हा मिळालेला विजय हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विजय ठरला.

गीता जैन

मीरा-भाईंदर मतदार संघातून गीता जैन या अपक्ष म्हणून निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या नरेंद्र मेहता यांचा 15000 मतांनी पराभव केला. त्यांना पक्षाने तिकीट नाकारले होते, म्हणून त्या अपक्ष म्हणून लढल्या आणि मग जिंकून आल्या.

सरोज अहिरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे या 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या त्या जायंट किलर ठरल्या. कारण गेल्या 30 वर्षापासून त्या ठिकाणी निवडून येणाऱ्या घोलप यांचा त्यांनी पराभव केला. त्यांना योगेश घोलप यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली.

मनीषा चौधरी

2014 साली मनीषा चौधरी या भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2019 साली त्या पुन्हा एकदा निवडून आल्या. दहिसर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या.

सुलभा खोडके

काँग्रेस पक्षाकडून सुलभा खोडके या अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांनी विद्यमान आमदार सुनील देशमुख यांचा पराभव केला.

रुतुजा लटके

रुतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या शिवसेनेच्या आमदार आहेत. पती रमेश लटके यांचे निधन झाल्यावर रुतुजा लटके यांनी पोटनिवणूक लढवली आणि त्या निवडून आल्या.

मंदा म्हात्रे

बेलापूर मतदारसंघाच्या सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेल्या मंदा म्हात्रे या विधानसभेतील एक ज्येष्ठ नेत्या आहेत. 2014 आधी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. मात्र 2014 नंतर त्या भाजपमध्ये गेल्या. नंतर २०१४ आणि २०१९ अशा दोनदा आमदार म्हणून निवडून आल्या.

माधुरी मिसाळ

पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा तब्बल 36000 हून अधिक मतांनी विजय झाला. त्या तिसऱ्यांदा आमदार झाल्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत.

यामिनी जाधव

भायखळा मतदार संघातून यामिनी जाधव या शिवसेनेकडून निवडून आल्या. भायखळ्याची जागा शिवसेनेला मिळाल्याने तो शिवसेना या पक्षासाठी ऐतिहासिक क्षण होता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.

लता सोनवणे

जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील आमदार म्हणून लता सोनवणे यांचा 2019 साली विजय झाला. लता सोनवणे या शिवसेनेकडून निवडून आले.

देवयानी फरांदे

भारतीय जनता पक्षाकडून नाशिक मध्ये मतदारसंघातून देवयानी फरांदे या निवडून आल्या. त्या 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेविका तर उपमहापौर होत्या.

भारती लवेकर

वर्सोवा मतदानातून भारती लवेकर या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांना 5000 हून अधिक मतांनी विजय मिळाला.

मंजुळा गावित

साक्री मतदार संघातून भाजपच्या बंडखोर उमेदवार असलेल्या मंजुळा गावित यांनी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेले मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केला. गावित या धुळेच्या माजी महापौर आहेत.

वर्षा गायकवाड

धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड या 2019 आली चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT