fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

"ज्याला वजन नाही त्याला...."; मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ज्यांच्या आरोपात वजनच नाही त्यांना कसलं वजन देता" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी नवाब मलिक यांनी केलेल्या ताज्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "मला वाटतं माझं ट्वीट पुरेस बोलंक आहे आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. ज्या आरोपांना काही वजनही नाही, त्याला कसलं वजन देता" दरम्यान, मलिकांविरोधात फडणवीस यांनी सकाळी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या कोटेशनचं सूचक ट्विट केलं होतं. "मी खूप पूर्वी शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. त्यामुळं तुम्ही गलिच्छ व्हाल पण डुकराला ते आवडतं" असं हे कोट आहे.

निवडणुकीची आत्ताच घोषणा झालीए थोडी वाट पाहा...

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, "निवडणूक घोषीत झाली आहे. याबाबत भाजपच्या राज्य निवड कमिटीची आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. या बैठकीत भाजपचे उमदेवार कोण असतील? हे आम्ही ठरवू. तशी शिफारस आम्ही केंद्र आणि भाजपला पाठवू. त्यानंतर आमचं पार्लमेंटरी बोर्ड याला मान्यता देईल. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीची नुकतीच घोषणा झालीए, थोडी वाट पाहा."

एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारची भूमिक असंवेदनशील

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिक असंवेदनशील आहे. हा संप चिघळू नये असं आम्हाला देखील वाटतं. जर सरकारनं दडपशाहीद्वारे आणि लोकांवर विविध प्रकारे कारवाई करुन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर ते आणखी वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि काही ना काही दिलासा या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे. इतक्या आत्महत्या झाल्यानंतरही हे सरकार जागं होणार नसेल तर हे चुकीचं आहे. एसटी महामंडळाच्या संदर्भात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत विविध आमदार हे सर्व लोक आंदोलन करत आहेत. मला असं वाटतं सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. आम्ही सर्वप्रकारची मदत करायला तयार आहोत, पण मार्ग काढून सरकारनं हा संप मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT