Avinash Bhosale Sakal
महाराष्ट्र बातम्या

रिक्षाचालक ते 3 हेलिकॉप्टरचे मालक; CBIने अटक केलेले अविनाश भोसले कोण आहेत?

अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखं दिसणाऱ्या आपल्या घरावर हेलिपॅड उभारणारे आविनाश भोसले हे राजकारण्यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर पुरवतात.

दत्ता लवांडे

पुण्यात फिरताना एखाद्या अलिशान इमारतीवर ABIL हे नाव तुम्ही कधीतरी बघितलं असेल. त्याच ABIL ग्रुपचे मालक आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना काल CBI कडून अटक करण्यात आली. येस बॅंक डीएचएफएल प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. तसं बघितंल तर अविनाश भोसले हा उद्योग विश्वातला मोठा हस्ती. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्यांच्या जवळचा व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे. पुण्यातील मोठा उद्योगपती आणि ABIL ग्रुपचा मालक म्हणून त्यांची ओळख आहे.

(Who Is Avinash Bhosale)

अविनाश भोसले. नाव बघितलं तर हा व्यक्ती कुणीतरी साधारण घरातला असेल असा अंदाज येतो. पण हा व्यक्ती साधासुधा नाहीये. अमेरिकेच्या व्हाईट हाऊससारख्या अलिशान बंगल्यात राहणाऱ्या आणि आपल्या घरावर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड असणारा हा व्यक्ती. यावरून तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल...

Avinash Bhosale

तसं बघितलं तर साधारण घरातला माणूस. मूळचे ते साताऱ्यातले. त्याच्या वडलांच्या नोकरीसाठी ते संगमनेरला आले. संगमनेरला काही दिवस राहिल्यावर कामधंद्याच्या निमित्ताने ते पुण्याला आले. सुरूवातीला त्यांनी रिक्षा चालवायला सुरूवात केली. काही दिवस रिक्षा चालवल्यावर त्यांनी रिक्षा व्यवसायात उतरायचं ठरवलं. त्यांनी नंतर पुण्यात राहून रिक्षा भाड्याने द्यायला सुरवात केली. धंदा सुरू झाला होता पण अजून काहीतरी करण्याची इच्छा असल्याने कंत्राटी कामं घ्यायला सुरूवात केली.

१९८० चं दशक. पुण्यात त्यांचा धंद्यात जम बसला होता. रिक्षाच्या व्यवसायासोबत त्यांनी बांधकामाच्या कंत्राटी व्यवसायातही आपलं साम्राज्य हळूहळू निर्माण केलं होतं. साल १९७९. ABIL- Avinash Bhosale Infrastructure Limited या कंपनीची स्थापना. बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडण्यासाठी १९७९ मध्ये त्यांनी ABIL ग्रुपची स्थापना केली होती. त्यांच्या बांधकाम क्षेत्रातील कामाचा आलेख वाढतंच होता. आपल्या कामाचा व्याप वाढत असताना त्यांच्या धंद्याला वळण मिळालं ते १९९५ मध्ये.

ABIL House

१९९५ मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं आणि त्यांना कृष्णा खोरं विकास महामंडळाचं काम त्यांना मिळालं. त्यानंतर त्यांच्या धंद्यात खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरूवात झाली. या सरकारी कामाच्या माध्यामातून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी धरणे, पाटबंधारे, कालवे बांधली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात आपल्या कामाची व्याप्ती वाढवली. त्यांना आपल्या यशाचं गमक सापडलं होतं. सरकारला हाताशी धरून त्यांना पुढे मोठमोठे विकास कामंही मिळाले. पुढे त्यांनी जलसंपदा विभागातील कामं करत करत बांधकाम आणि हॉटेल क्षेत्रात उतरायचं ठरवलं.

त्यानंतरच्या काळात त्यांच्या व्यवसायात प्रचंड वेगाने वाढ झाली. त्यांच्या या जलद गतीने वाढलेल्या व्यवसायाला आणि प्रगतीला 'रॉकेट राईज' असं त्यांना जवळून अनुभवलेले लोक म्हणतात. त्यांनी नंतर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी व्यक्तीशी आपली जवळीक वाढवली. प्रत्येक राजकारणी व्यक्तींशी व्यक्तिगत नातं हे त्यांच्या यशाला जोड देणारं ठरलं. पुढे त्यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अलिशान हॉटेलच्या उद्घाटनासाठी राजकारणातील मोठमोठे हस्ती हजर होते. तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि देशाचे तात्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील उपस्थित होते.

Avinash Bhosale House

त्यांनी पुण्यातील बाणेर भागात आपला बंगला बांधला. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा दिसणारा हा अलिशान बंगला. त्यालाही व्हाईट हाऊसं असं नाव देण्यात आलंय. विशेष म्हणजे त्यांच्या या बंगल्यावर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड आहे. यासोबत त्यांचे पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी कार्यालये आहेत. पुढे सांगलीतील काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांच्याशी त्यांनी पुढे आपले नातेसंबंध जोडले. पतंगराव कदम यांचा मुलगा आणि सध्याचे काँग्रेचे नेते विश्वजित कदम यांना आपली मुलगी दिली आणि राजकारणातील आपला दबदबा कायम ठेवला. सर्वच पक्षातील राजकारण्यांशी जवळचा संबंध असलेला माणूस म्हणजे अविनाश भोसले.

तसं बघितलं तर हा माणूस हेलिकॉप्टरचा वेडा. यांच्याकडे सध्या तीन हेलिकॉप्टर्स आहेत. आपल्या घराच्या टेरेसवर त्यांनी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड उभं केलंय. राजकारण्यांच्या वैयक्तिक कामासाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी नंतर हेलिकॉप्टर द्यायला सुरवात केली. राजकीय नेते जे हेलिकॉप्टर वापरतात ते हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांचेच असल्याची शक्यता जास्त असते. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारीची केलेली फोटोग्राफी ज्या हेलिकॉप्टरमधून केली आहे ते अविनाश भोसले यांचेच.

Avinash Bhosale's House

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. अनेकवेळा बाळासाहेब ठाकरे अविनाश भोसले यांच्या बंगल्यात मुक्कामाला राहिले आहेत. बाळासाहेब ज्यावेळी पुण्याच्या दौऱ्यावर येत त्यावेळी अविनाश भोसले स्वत: त्यांच्या गाडीचे चालक होत असत. त्यावेळी याची माध्यमातही जोरदार चर्चा व्हायची.

१९९५ साली सेना भाजपा युती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास ५० टक्क्याहून जास्त धरणाचे बांधकाम अविनाश भोसले यांच्या कंपनीने केले. पण त्यांच्या या गतीला ब्रेक मिळाला तो २००७ मध्ये. धरणाच्या कामासाठी अॅडव्हान्स पैसे देण्याच्या कारणारून झालेल्या चौकशीत त्यावेळी त्यांच्यावर महसूल विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या घोटाळा चव्हाट्यावर आला आणि अविनाश भोसले यांचं नाव चर्चेत येऊ लागलं.

Amit Bhosale- सध्या ABIL ग्रुपचे संचालक अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले हे आहेत.

त्यांनी रिझर्व बॅंकेची परवानगी न घेता परदेशात खाते उघडल्याचा आरोप त्यांच्यावर नंतर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला होता. त्या खात्यात पैसे जमा झाल्याच्या कारणावरूनही त्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. २०१७ साली आयकर विभागाने त्यांच्या घरी छापा टाकला त्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. २०२० मध्ये त्यांची पुन्हा ईडीने चौकशी केली आणि ते पुन्हा ईडीच्या फेऱ्यात सापडले. त्यानंतर त्यांना काल CBI ने येस बँक डीएचएफएल प्रकरणात अटक केली आहे. अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले हे सध्या ABIL ग्रुपचे संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT